AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs PAK Rain : पाऊसच करणार पाकिस्तानचं काम तमाम! कसं असेल हवामान?

Pakistan Semi Final Qualification Scenario : पावसामुळे सुपर 8 फेरीतील पहिला सामना रद्द झाल्याने पाकिस्तानच्या सेमी फायनल मोहिमेला मोठा झटका लागला. त्यामुळे पाकिस्तानसाठी उर्वरित दोन्ही सामने करो या मरो असे आहेत.

ENG vs PAK Rain : पाऊसच करणार पाकिस्तानचं काम तमाम! कसं असेल हवामान?
Pakistan Semi Final Qualification Scenario T20I WC 2026Image Credit source: AP
| Updated on: Feb 24, 2026 | 6:41 PM
Share

पाकिस्तान क्रिकेट टीमने सलमान आघा याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत 4 पैकी 3 सामने जिंकले. पाकिस्तान टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत नेहमीप्रमाणे टीम इंडियासमोर फुस्स ठरली. तर पाकिस्तानने इतर 3 सामने जिंकत सुपर 8 मध्ये धडक दिली. सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सुपर 8 मधील प्रत्येक सामना अटीतटीचा आहे. अशात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सुपर 8 मधील पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. हा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानच्या मिशन सेमी फायनलला मोठा झटका लागला. त्यामुळे पाकिस्तानला सुपर 8 फेरीतील उर्वरित दोन्ही सामने चांगल्या फरकाने जिंकावे लागणार आहेत.

पाकिस्तानसमोर सुपर 8 फेरीतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचं आव्हान आहे. इंग्लंडने त्यांच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर अप्रतिम विजय मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंडकडे दुसरा सामना जिंकून सेमी फायनलचा दावा मजबूत करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड विरुद्धचा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानसाठी इंग्लंड विरुद्धचा सामना हा आर या पार असा आहे. अशात हा सामना पावसामुळे रद्द झाला तर पाकिस्तानचं काहीही न करता आव्हान संपुष्टात येईल. या निमित्ताने इंग्लंड-पाकिस्तान सामन्यात हवामान कसं असेल? तसेच शेजाऱ्यांचं उपांत्य फेरीसाठी समीकरण कसं आहे? हे जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर 8 फेरीतील सामना हा मंगळवारी 24 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. पाकिस्तानच्या खात्यात 1 गुण आहे. इंग्लंड विरुद्धचा सामनाही पावसामुळे वाया गेल्यास पाकिस्तानच्या खात्यात एकूण 2 पॉइंट्स होतील. त्यामुळे इंग्लंड विरुद्धचा सामनाही वाया गेल्यास पाकिस्तानला उपांत्य फेरीत स्वत:च्या जोरावर पोहचता येणार नाही. त्यामुळे पाकिस्तानला स्वत:च्या ताकदीवर उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर इंग्लंड विरुद्ध विजय आवश्यक आहे.

हवामानाचा अंदाज काय?

चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हवामान विभागानुसार, इंग्लंड-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट नाहीय. सामन्यादरम्यान पाऊस होण्याची शक्यता ही 2 टक्के इतरी आहेत. तर तापमान हे जवळपास 27 अंश सेल्सियस इतके असेल. त्यामुळे 20 ओव्हरचा खेळ होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचं सेमी फायनलचं समीकरण

पाकिस्तानने इंग्लंडला पराभूत केल्यास त्यांचे 3 पॉइंट्स होतील. तसेच पाकिस्तानने सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेवर मात केल्यास 3 चे 5 गुण होतील. त्यामुळे पाकिस्तानची उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता वाढेल. मात्र इंग्लंडने पराभूत केलं तर पाकिस्तानचं समीकरण जर तरवर असेल. त्यामुळे इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केलं तर पाकिस्तानची आशा कायम राहिल. तसेच नेट रनरेटही निर्णायक ठरेल.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...