AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC Super 8 : इंग्लंडने श्रीलंकेचा 51 धावांनी उडवला धुव्वा, झालं असं की..

T20 WC 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या गट 2 मधील सुपर 8 फेरीत श्रीलंका आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला 51 धावांनी पराभूत केलं. तसेच सुपर 8 फेरीत आपलं स्थान भक्कम केलं आहे.

T20 WC Super 8 : इंग्लंडने श्रीलंकेचा 51 धावांनी उडवला धुव्वा, झालं असं की..
Image Credit source: England Cricket Twitter
| Updated on: Feb 22, 2026 | 6:19 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये श्रीलंका आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावले आणि 146 धावांची खेळी केली. तसेच श्रीलंकेसमोर 147 धावांचं आव्हान ठेवलं. श्रीलंकेचा संघ सर्व गडी बाद 95 धावा करू शकला. इंग्लंडने हा सामना 51 धावांनी जिंकला. यासह इंग्लंडने उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे.

श्रीलंकेचा डाव

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत विजयी धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव पत्त्यासारखा कोसळला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. पावरप्लेच्या 6 षटकात श्रीलंकेने अवघ्या 34 धावांवर 5 विकेट गमावले होते. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. प्रत्येक विकेटनंतर श्रीलंकेवर दबाव वाढत गेला. पाथुम निस्संका 9, कामिल मिशारा 6, कुसल मेंडिस 4, पवन रत्ननायके 0, दुनिथ वेल्लागे 10, दुशन हेमंथा 5 आणि कामिंदु मेंडिस 13 धावा करून बाद झाले. कर्णधार दासुन शनाकाने झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने 24 चेंडूत 30 धावा केल्या. यात 2 षटकार आणि एक चौकार मारला. विल जॅक्सने श्रीलंकेला मोठा धक्का दिला. त्याने 4 षटकात 22 धावा देत 3 गडी बाद केले.

इंग्लंडचा डाव

इंग्लंडकडून फिलिप सॉल्टने एकाकी झुंज दिली. त्याने 40 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 62 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकलं नाही. एकाही फलंदाजाला 25 धावांचा आकडा गाठता आला नाही. विल जॅक्सने 21 धावांची खेळी केली. इंग्लंडला पहिला धक्का जोस बटलरच्या रुपाने बसला. संघाच्या 14 धावा असताना जोस बटलर 7 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर धडाधड विकेट पडत गेल्या. जेकब बेथेलने 3, टॉम बँटनने 6, हॅरी ब्रूकने 14, सॅम करनने 11. लियाम डावसन 6 धावा करून तंबूत परतले. जेमी ओव्हरटन नाबाद 10 आणि अदिल राशीद नाबाद 1 धावांवर राहिले. जोफ्रा आर्चरला तर खातंही खोलता आलं नाही.  दिलशान मदुशंका 2, डुनिथ वेलागेने 3, महेश थीक्षाना 2, दुष्मंथ चामीराने 1 विकेट काढली.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा