AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs South Africa: संजू सॅमसनला प्लेइंग 11 मधून डावलणं पडू शकतं महागात, कारण की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होत आहे. या सामन्यात प्लेइंग 11 काय असेल? याबाबत चर्चा रंगली आहे. असं असताना संजू सॅमसनला संधी देण्याची मागणी होत आहे. त्याला कारणही तसंच आहे.

India vs South Africa: संजू सॅमसनला प्लेइंग 11 मधून डावलणं पडू शकतं महागात, कारण की...
संजू सॅमसनला प्लेइंग 11 मधून डावलणं पडू शकतं महागात, कारण की...Image Credit source: PTI
| Updated on: Feb 22, 2026 | 5:36 PM
Share

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात गट 1 मधील सुपर 8 फेरीचा पहिला सामना होत आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण उपांत्य फेरी गाठायची असेल तर सुपर 8 फेरीत विजयी सुरूवात करणं गरजेचं आहे. नाही तर गणित जर तरवर येऊ शकते. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्ध प्लेइंग 11 निवडताना काळजी घेण्याची गरज आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यापूर्वी भारताची माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने टीम इंडियाला इशारा दिला आहे. इतकंच काय तर संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये खेळवण्याची मागणी केली आहे. त्या मागचं कारणही त्याने सांगितलं आहे. मोहम्मद कैफने सांगितलं की, टीम इंडियाची फलंदाजी कमकुवत दिसत आहे. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होऊ शकतो. संजू सॅमसन प्लेइंग 11चा भाग असेल तर नक्कीच टीम इंडियाला फायदा होईल. चला जाणून घेऊयात मोहम्मद कैफचं म्हणणं तरी काय?

मोहम्मद कैफने सोशल मीडियावर संजू सॅमसनची बाजू घेणारी पोस्ट केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, टीम इंडियात खूप सारे डावखुरे फलंदाज आहेत. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होऊ शकतो. कैफने लिहिलं की, ‘भारताचे टॉप ऑर्डरमध्ये खूप जास्त डावखुरे आहेत. त्यामुळे विरोधी संघाला प्लान आखणं सोपं जाईल. ते ऑफ स्पिनर्स त्यांच्या विरुद्ध आणू शकतात. सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान देऊन गोष्टी बदलू शकतो.’ खरं तर अभिषेक शर्माचा फॉर्म पाहून संजू सॅमसनला स्थान देण्याची मागणी होत आहे. कारण त्याने मागच्या तीन सामन्यात एकही धाव केलेली नाही. पण कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर याचा त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे प्लेइंग 11 मधून वगळयाचं तर कोणाला? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

संजू सॅमसन आत तर बाहेर कोण?

संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये संधी देण्याची चर्चा सुरू आहे. पण त्याच्यासाठी कोणाला संघातून बाहेर जावं लागेल हे मात्र सांगणं कठीण आहे. असं असताना तिलक वर्माच्या नावाची चर्चा होत आहे. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट चिंतेचा विषय आहे. त्याने चार सामन्यात 106 धावा केल्या आहे. यावेळी त्याचा बॅटिंग एव्हरेज 26.5चा आहे. तर स्ट्राईक रेट हा 120 चा आहे. त्याच्या तुलनेत हा स्ट्राईक रेट खूपच कमी आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनला फक्त एकाच सामन्यात संधी मिळाली आहे. त्याने 22 धावा केल्या. पण त्याचा स्ट्राईक रेट हा 275चा होता.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा