AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची 60 चेंडूत पोलखोल, सुपर 8 आणि बाद फेरीत टेन्शन!

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघाने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. साखळी फेरीत एकही सामना न गमावता टीम इंडियाने सुपर 8 फेरी गाठली आहे. आता सुपर 8 फेरीत तगड्या संघांचं आव्हान असणार आहे. असं असताना भारतीय संघाची कमकुवत बाजू समोर आली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची 60 चेंडूत पोलखोल, सुपर 8 आणि बाद फेरीत टेन्शन!
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची 60 चेंडूत पोलखोल, सुपर 8 आणि बाद फेरीत टेन्शन!Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 22, 2026 | 3:55 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. गतविजेत्या भारतीय संघाने साखळी फेरीत चांगली कामगिरी केली. एकही सामना न गमावता सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. भारताचा सुपर 8 फेरीत पहिलाचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी वाटतो तितका सोपा नाही. पण उपांत्य फेरी गाठायची तर हा सामना जिंकणं भाग आहे. असं असताना साखळी फेरीत भारताची कमकुवत बाजू उघड झाली आहे. त्यामुळे भारतीय संघाला काळजीपूर्वक सामना करणं भाग आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. भारताने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहेत. पण 7 ते 10 षटकादरम्यान फिरकीपटूंविरोधात कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

भारतीय संघाने 7 ते 10 षटकादरम्यान फिरकीपटूंविरूद्ध 60 चेंडूत 64 धावा केल्या आहेत. टीम इंडियाची सरासरी फक्त 32ची आहे आणि स्ट्राईक रेट हा 106.6चा आहे. या षटकांमध्ये इतर संघ 1168 चेंडूत 1438 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राई रेट 123.1 चा आहे. त्यामुळे इतर संघाच्या तुलनेत भारतीय संघ मधल्या फळीत फिरकीपटूंविरुद्ध अडचणीत आल्याचं अधोरेखित होत आहे. आता भारताचा सामना सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेशी होत आहे. दक्षिण अफ्रिकेनेही एकही सामना गमावलेला नाही. अशा स्थितीत भारताची कामगिरी 7 ते 10 षटकादरम्यान कशी राहते यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. दक्षिण अफ्रिकेच्या ताफ्यात केशव महाराज, एडन मार्करम यासारखे कसलेले फिरकीपटू आहेत.

सुपर 8 फेरीत भारताचा दुसरा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. या संघात सिकंदर रझा, रायन बर्ल आणि ग्रेम क्रीमर हे फिरकीपटू आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध 1 मार्च रोजी सामना होणार आहे. या संघात अकील होसैन, गुडाकेश मोती असे फिरकीपटू आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना यांचा सामना करताना अडचण आली तर आश्चर्य वाटायला नको. गेल्या काही वर्षात भारतीय फलंदाज फिरकीचा सामना करताना अडखळत असल्याचं दिसून आलं आहे. त्याचे परिणाम खास करून कसोटी सामन्यात दिसले आहेत.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा