AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यकुमार यादवचं टी20 क्रिकेटमध्ये होणार कमबॅक! पण हा कठीण टप्पा करावा लागणार पार

भारताला टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव संघातून आऊट झाला आहे. सुमार कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आलं आहे. पण सध्या टीम इंडियाची स्थिती नाजूक आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या कमबॅकच्या बातम्या समोर येत आहेत.

सूर्यकुमार यादवचं टी20 क्रिकेटमध्ये होणार कमबॅक! पण हा कठीण टप्पा करावा लागणार पार
सूर्यकुमार यादवचं टी20 क्रिकेटमध्ये होणार कमबॅक! पण हा कठीण टप्पा करावा लागणार पारImage Credit source: PTI
| Updated on: Jul 13, 2026 | 7:24 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने जेतेपद मिळवलं. पण सूर्यकुमार यादवला त्यानंतर धक्का बसला. कारण त्याला भारतीय संघातून वगळण्यात आलं. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने चांगली कमगिरी केली, पण त्याचं वैयक्तिक योगदान काही खास नव्हतं. त्यामुळे त्याला पुढच्या टप्प्यात संघात ठेवणं उचित मानलं गेलं नाही. त्याच्याकडील कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर टाकली. तर सूर्यकुमार यादवचं करिअर संपलं असंच अनेकांना वाटत आहे. पण तसं नाही.. सूर्यकुमार यादव टीम इंडियात पुनरामगन करू शकतो. रिपोर्टनुसार, सूर्यकुमार यादवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याला पुन्हा टीम इंडियात स्थान मिळू शकते.

सूर्यकुमार यादव या स्पर्धेत संधी

सूर्यकुमार यादवकडे टीम इंडियात पदार्पणासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी सूर्यकुमार यादवला विजय हजारे, सय्यद मुश्ताक अली आणि दुसऱ्या टी20 स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. त्याची कामगिरी अपेक्षित राहिली तर नक्कीच निवडकर्ते त्याचा विचार करतील. एएनआयच्या वृत्तानुसार, टीम इंडियाच्या सूत्रांकडून ही माहिती समोर आहे. सूर्यकुमार यादवच्या गैरहजेरीत टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक आहे. भारताने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका गमावली आहे. भारताला एकही सामना जिंकता आलेला नाही.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पराभवाची मालिका

सूर्यकुमारनंतर श्रेयस अय्यरकडे नेतृत्व सोपवलं गेलं. पण त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाची टी20 क्रिकेटमध्ये वाताहात झाली आहे. आयर्लंडविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने गमावली. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-0 ने मात मिळाली. इंग्लंडविरुद्धचा पराभव 5-0 असू शकला असता पण पावसामुळे पहिला सामना रद्द झाला आणि आणखी एक पराभव वाचला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने सात सामने खेळले आणि एकातही विजय मिळाला नाही. आता भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 23 जुलै, दुसरा सामना 25 जुलै आणि तिसरा सामना 26 जुलैला होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे लक्ष असणार आहे.

Follow Us
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा... नेमकं काय म्हणाले?
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड
Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू
उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट?
मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच...
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?; सुनेत्रा पवारांना रोहिणी खडसेंचं थेट आवाहन, म्हणाल्या...
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!