WTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास

| Updated on: Jun 21, 2021 | 12:48 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यातील भारताचा पहिला डाव खराब करण्यात न्यूझीलंडच्या एका खेळाडूचा सिंहाचा वाटा होता. त्याने विराट, रोहित आणि ऋषभ हे महत्त्वाचे गडी बाद केले.

WTC Final : काईल जेमिसनने तोडला 80 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, भारतीय फलंदाजांवर हल्लाबोल करत रचला इतिहास
NZ vs IND - Kyle Jamieson
Follow us on

साऊथॅम्प्टन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आला. भारताकडे असणारी तगडी बॅटिंग लाईन पाहता हा स्कोर बराच कमी होता. पण यामागील कारण ठरला न्यूझीलंडचा 6 फुट 8 इंच उंचीचा बोलर काईल जॅमिसन. जॅमिसनने कर्णधार विराटसह (Virat Kohli) ऋषभ पंतचा (Rishabh Pant) आणि सुरुवातीला हिटमॅन रोहित शर्माची (Rohit Sharma) विकेट घेतली. सोबतच बुमराह आणि इशांत यांना एकात ओव्हरमध्ये बादही केलं. जेमिसनने एकाच डावात भारताचे 5 गडी बाद करत त्याने न्यूझीलंड संघातील एक 80 वर्षे जुना रेकॉर्डही तोडला आहे. (In ICC WTC Final New Zealands Kyle Jamieson Took Five Wickets Against India and break 80 years old record)

भारताविरुद्धच्या पहिल्य डावात घेतलेल्या या 5 विकेट्सच्या जोरावर जेमिसन न्यूझीलंडकडून कारकिर्दीतील पहिल्या 8 सामन्यांत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. याआधी न्यूझीलंडचे माजी दिग्गज गोलंदाज जॅक कॉवी यांनी 1937 ते 1949 या काळात कारकिर्दीतील पहिल्या 8 टेस्टमध्ये 41 विकेट्स मिळवले होते. त्यानंतर आता जेमिसनने पहिल्याच डावातील 5 विकेट्सह तब्बल 44 विकेट्स पटकावत कॉवी यांना मागे टाकत नवा रेकॉर्ड रचला आहे.

जेमिसन ठरला भारतीयासांठी घातक

भारतीय संघाला शुभमन गिल आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात (62 धावांची भागीदारी) करुन दिली. मात्र जेमिसनने शर्माचा विकेट घेत न्यूझीलंडला ब्रेक थ्रू मिळवून दिला. ज्यानंतर काही वेळात गिल आणि पुजाराही बाद झाले. दुसऱ्या दिवशीचा खेळ 146 वर 3 बाद असा रहाणे आणि कोहलीने सुरु केला खरा पण जेमिसनने पुन्हा हल्ला करत आधी कोहली मग पंतचा विकेट मिळवला. त्यानंतर सामन्याची संपूर्ण मदार जाडेजावर असताना बुमराह आणि इशांत यांना देखील जेमिसनने एकाच ओव्हरमध्ये लागोपाठ बाद केले. अशारितीने जेमिसनने सामन्यात तब्बल 5 विकेट मिळवत भारतीय संघावर हल्लाबोल केला.

हे ही वाचा

WTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली ‘ही’ युक्ती, रहाणे फसला जाळ्यात

ICC WTC Final 2021 : शुभमन गिलवर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, हेल्मेटवर चेंडू आदळला, गिल थोडक्यात बचावला

Photo : इंग्लंडमधील संयमी खेळीचं विराटला फळ, आशियाभरात नाव, धोनीलाही टाकलं मागे

(In ICC WTC Final New Zealands Kyle Jamieson Took Five Wickets Against India and break 80 years old record)