AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2021 : भारतीय संघाचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला, जेमिसनसमोर दिग्गजांनी टेकले गुढघे

भारतीय संघाला शुभमन गिल आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात (62 धावांची भागीदारी) करुन दिली. मात्र शर्मा बाद झाल्यानंतर गिल आणि नंतर पुजारा दोघेही बाद लवकर बाद झाले.

WTC Final 2021 : भारतीय संघाचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला, जेमिसनसमोर दिग्गजांनी टेकले गुढघे
NZ vs IND - Kyle Jamieson
| Edited By: | Updated on: Jun 20, 2021 | 10:27 PM
Share

साऊथॅम्प्टन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021)  न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्णयाला साजेशी खेळी करत न्यूझीलंडने अप्रतिम बोलिंगच्या जोरावर भारताचा पहिला डाव 217 धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने (Kyle Jamieson)भेदक गोलंदाजी करत 5 विकेट्स मिळवले. तर भारताकडून रहाणे (49) आणि कोहली (44) यांच्याशिवाय कोणालाच खास धावसंख्या करता आली नाही. (ICC WTC Final India First Innings All out on 217 Against New Zealand Kyle Jamieson Took 5 Wickets)

भारतीय संघाला शुभमन गिल आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात (62 धावांची भागीदारी) करुन दिली. मात्र शर्माच्या बाद झाल्यानंतर गिल आणि नंतर पुजारा दोघेही बाद लवकर बाद झाले. ज्यामुळे दुसऱ्या दिवसाखेरीस भारताचा स्कोर 146 वर 3 बाद होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीपासून एक एक विकेट जाण्यास सुरुवात झाली आधी विराट मग पंत बाद झाला. दरम्यान अजिंक्य संयमी खेळी करत असताना न्यूझीूलंडच्या जाळ्यात अडकला आणि भारताची सहावी  विकेट पडली. ज्यानंतर काही वेळात आश्विन ही बाद झाला. सामन्याची संपूर्ण मदार जाडेजावर असताना बुमराह आणि इशांत हे जेमिसनच्या ओव्हरमध्ये लागोपाठ बाद झाले. ज्यानंतर 92 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जाडेजाही बाद झाला आणि भारताचा डाव 217 धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने 5, नील वॅगनर आणि ट्रेन्ट बोल्टने प्रत्येकी 2 आणि टीम साऊदीने एक विकेट मिळवला.

रहाणेला खास ‘प्लॅन’ करुन केलं बाद

एकीकडे जॅमिसन सर्व महत्त्वाचे विकेट्स मिळवत असताना त्याला पुरुन उरला होता तो एकमेव अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane). त्यामुळे अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने एक खास युक्ती वापरली.  रहाणे 100 हून अधिक बॉल खेळला होता. बराच काळ क्रिजवर असणाऱ्या रहाणने 46 धावांवर असताना स्केवर लेगला एक उत्कृष्ट शॉट खेळत 3 धावा केल्या. ज्यानंतर तो केवळ 1 धाव दूर होता आपल्या अर्धशतपासून त्याच वेळी रहाणे हात खोलतो आहे हे कळताच न्यूझीलंडने स्केवर लेगला आणखी एक खेळाडू ठेवत तब्बल पाच खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी ठेवले. त्यानंतरच्याच नील वॅगनरच्या बॉलवर रहाणेने पुन्हा पुल शॉट खेळला जो थेट लॅथम याच्या हातात गेला आणि रहाणे बाद झाला.

हे ही वाचा

WTC Final 2021 : भारतीय संघावर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, एकाच डावांत 5 खेळाडूंना धाडलं तंबूत

ICC WTC Final 2021 : शुभमन गिलवर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, हेल्मेटवर चेंडू आदळला, गिल थोडक्यात बचावला

Photo : इंग्लंडमधील संयमी खेळीचं विराटला फळ, आशियाभरात नाव, धोनीलाही टाकलं मागे

(ICC WTC Final India First Innings All out on 217 Against New Zealand Kyle Jamieson Took 5 Wickets)

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.