AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: एका ओव्हरमध्ये 4 विकेट्स, PNG संघाची कमाल, तरीही स्कॉटलंडकडून पराभव

स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी या संघामध्ये झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने 17 धावांनी मात देत आपला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला आहे. याआधी त्यांनी बांग्लादेशला पराभूत केलं होतं.

T20 World Cup 2021: एका ओव्हरमध्ये 4 विकेट्स, PNG संघाची कमाल, तरीही स्कॉटलंडकडून पराभव
एकाच षटकात तीन विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करताना पीएनजीचा कबुआ मोरिया
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 7:23 PM
Share

T20 Cricket World Cup 2021: टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) सामन्यांना सुरुवात होऊन दोनच दिवस झाले असले तरी दररोज काहीतरी हटके पाहायला मिळत आहे. सोमवारच्या सामन्यांमध्ये आधी आयर्लंडचा गोलंदाज कर्टिस कँफर (Curtis Campher) याने नेदरलँडच्या 4 फलंदाजाना सलग 4 चेंडूवर तंबूत धाडलं. त्यानंतर सायंकाळच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार शनाकाने नामबियाच्या एका फलंदाचा पकडलेला झेल हा तर डोळ्याचे पारडे फेडणारा ठरला. त्यानंतर आजही स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी या संघामध्ये दुपारी झालेल्या सामन्यात पुन्हा एका षटकात चार विकेट्स पडल्याचे पाहायाला मिळाले. पीएनजी संघाने ही कमाल केली असली तरी अखेर त्यांना पराभव पत्करावा लागला

सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत स्कॉटलंड संघाने फलंदाजी निवडली. निर्णय घेतल्याप्रमाणे खेळाडू फलंदाजीही तशीच जबरदस्त करत चांगली धावसंख्या केली. 165 धावांपर्यंत मजल मारणारा स्कॉटलंडता संघ आणखी मोठी धावसंख्या करेल असे वाटत होते. पण अखेरच्या षटकात ज्यात संघ अधिक धावा करेल वाटत होते त्याचवेळी संघाचे 4 फलंदाज बाद झाले. या चार विकेट्स पैकी तीन विकेट् गोलंदाज कबुआ मोरियाने घेतले तर एक गडी धावचीत झाला.

अशी केली कमाल

स्कॉटलंड संघाच्या फलंदाजीची शेवटची ओव्हर सुरु होती. यावेळी दुसऱ्या चेंडूवर ख्रिस ग्रेव्हस याला मोरियाने लेगा सियाकाच्या हाती झेलबाद केलं. त्यानंतर चौथ्या चेंडूवर मिचेल लीस्क हा धावचीत झाला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर जोश डेवी आणि सहाव्या चेंडूवर मार्क वॅट याचा विकेट मोरियाने घेत एका षटकात तीन विकेट घेतले. तर संघाने हॅट्रिक केली. ज्यामुळे स्कॉटलंडला 165 धावांवर समाधान मानावं लागलं.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

नोर्मानची झुंज अपयशी, पीएनजी पराभूत

त्यानंतर 166 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पीएनजी संघाला आव्हान पूर्ण करता आले नाही.  19.3 ओव्हरमध्येच त्यांचा संघ सर्वबाद झाला. ते मिळून 148 धावाचत करु शकल्याने त्यांचा 17 धावांनी पराभव झाला. संघाकडून नोर्मान याने 47 धावांची एकाकी झुंज दिली. पण त्यावा योग्य साथ न मिळाल्याने तो संघाला जिंकवण्यात अपयशी ठरला.

हे ही वाचा

अक्षर पटेल मुख्य संघातून राखीव खेळाडूंमध्ये जाण्यामागे हार्दीक पंड्या, वाचा नेमकं प्रकरण काय?

T20 World Cup साठी भारतीय संघाची रणनीती ठरली, अशी असेल टीम इंडिया, काय म्हणाले रवी शास्त्री?

…नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा

(In t20 world Cup 2021 match between Scotland vs Papua New Guinea Scotland beat Papua New Guinea by 17 runs)

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.