…नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा

सध्या भारतीय क्रिकेट संघातील टॉपचा अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्या याने जीवनात फार कष्ट आणि मेहनत करुन इथवर आला आहे. हे साऱ्यांनाच माहित आहे. त्याने याबद्दलच एका मुलाखतीत काही गोष्टी सांगितल्या आहेत.

...नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा
हार्दीक पंड्या
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 5:14 PM

मुंबई: पैसा म्हणजे मनुष्याच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. हा कमावण्यासाठी प्रत्येकजण मेहनत करत असतोच. अशाच प्रयत्नांनी आणि मेहनतीच्या जोरावर बक्कळ पैसा कमवून भारतीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा खेळाडू झालेल्या हार्दीक पंड्याने (Hardik Pandya) पैशाचं महत्त्व सांगताना माझ्याकडे पैसे नसते तर क्रिकेट खेळण्याऐवजी एखाद्या पेट्रोल पंपावर काम करत असतो असं म्हणाला आहे. एसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत पंड्याने त्याच्या जीवनातील जडणघडण आणि प्रवासाबद्दल काही गोष्टी शेअर केल्या.

हार्दीकने मुलाखतीत सांगितलं की, ”पैसा ही खरचं फार महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. यामुळे अनेक गोष्टी बदलतात, मी स्वत:ही याचच एक उदाहरण आहे. कारण वडिलांचा व्यवसाय ठप्प झाल्यानंतर आमचं बालपण फार हलाखीत गेलं. त्यामुळे वेळीच पैसे आले नसते तर मी एखाद्या पेट्रोल पंपवर काम करत असतो.” यावेळी बोलताना पंड्याने त्याच्या पुढे जाण्यात कुटुंबाचा मोठा हात असल्याचं सांगितलं. तो म्हणाला,”आमच्या कुटुंबात आम्हा सर्वांच एकमेकांशी फार जवळचं नात आहे. माझ्या अनेक गोष्टी चुकतात त्या मला माझ्या घरातले समजावून सांगतात. आम्ही कितीही पुढे गेलो तरी पाय जमिनीवर ठेवायला घरातल्यांनीच शिकवलं आहे.”

धोनीच्या अनुपस्थितीत पंड्यावर मोठी जबाबदारी

टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून या प्रकारात स्फोटक फलंदाज आणि फिनीशरची जबाबदारी फार मोठी असते. त्यातच भारताचा फिनीशर अर्थात माजी कर्णधार दोनी याने निवृत्ती घेतल्यामुळे सध्या फिनीशर म्हणून सर्व जबाबदारी हार्दीक पंड्यावरच आहे. त्यामुले आगामी विश्वचषकाबद्दल बोलताना पंड्या म्हणाला, ”हे माझ्या कारकिर्दीतील फार मोठं आव्हान असणार आहे. यंदा संघात महेंद्र सिंह धोनी नाही त्यामुळे माझ्या खांद्यावर फार जबाबदारी असणार आहे.”

इतर बातम्या

युवराज सिंगला हरियाणा पोलिसांकडून अटक अन् सुटका, चहलला अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल FIR

टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

T20 World Cup मध्ये 7 भारतीय क्रिकेटपटूंचं पदार्पण, पाकिस्तानला भिडून चौघे दाखवणार रुबाब

(Money is Important or else im work on petrol pump says indian cricketer Hardik pandya)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.