AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युवराज सिंगला हरियाणा पोलिसांकडून अटक अन् सुटका, चहलला अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल FIR

युवराजच्या या वक्तव्यानंतर बराच वाद झाला आणि सोशल मीडियावर त्याच्या विरोधात बरीच मोहीम सुरू झाली. दुसरीकडे सोशल मीडिया व्यतिरिक्त हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हंसी येथील वकील रजत कलसन यांनी माजी भारतीय क्रिकेटपटूविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर एससी-एसटी कायद्याच्या कलमांखाली युवराजविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. हे वकील गेल्या वर्षापासून युवराजच्या अटकेची मागणी करत होते.

युवराज सिंगला हरियाणा पोलिसांकडून अटक अन् सुटका, चहलला अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल FIR
yuvraj singh
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 11:28 PM
Share

नवी दिल्ली: टीम इंडियाचे माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला त्यांच्याच सहकारी क्रिकेटपटूबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी हरियाणामध्ये अटक करण्यात आली. डावखुरा भारतीय क्रिकेटपटू युवराजला शनिवारी 16 ऑक्टोबरला हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसी येथे अटक करण्यात आली. युवराजवर जातीवादी शब्द वापरल्याचा आरोप होता, ज्याची तक्रार गेल्या वर्षी करण्यात आली होती. यानंतर एससी-एसटी कायद्याच्या प्रकरणात त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. आता रविवारी त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली. मात्र, त्यालाही लगेच जामीन मिळाला. पण तक्रारदार वकील आणि सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल असमाधान व्यक्त केले. पोलिसांनी त्याच्यावर योग्य कारवाई केली नाही. तसेच पोलिसांनी युवराज सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोपही केला. लवकरच अंतरिम जामिनाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचंही रजत कलसन यांनी सांगितले.

बेजबाबदार टिप्पणीमुळे वादात सापडला होता

किंबहुना युवराज सिंह गेल्या वर्षी त्याच्या एका बेजबाबदार टिप्पणीमुळे वादात सापडला होता. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान इतर अनेक खेळाडूंप्रमाणे युवराज सिंहदेखील आपल्या सहकारी खेळाडूंसह इंस्टाग्राम लाईव्हवर बोलत होता आणि चाहत्यांचे मनोरंजन केले. त्याने टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मासोबत असेच एक लाईव्ह चॅट केले. या लाईव्हदरम्यान युवीने भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलबद्दल एक शब्द वापरला होता, जो जातीवादी टिप्पणीच्या कक्षेत आला होता.

युवराजचा निषेध आणि वादानंतर एफआयआर

युवराजच्या या वक्तव्यानंतर बराच वाद झाला आणि सोशल मीडियावर त्याच्या विरोधात बरीच मोहीम सुरू झाली. दुसरीकडे सोशल मीडिया व्यतिरिक्त हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हंसी येथील वकील रजत कलसन यांनी माजी भारतीय क्रिकेटपटूविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर एससी-एसटी कायद्याच्या कलमांखाली युवराजविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. हे वकील गेल्या वर्षापासून युवराजच्या अटकेची मागणी करत होते.

कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मिळाला

2019 मध्ये या प्रकरणात युवराजने अटक टाळण्यासाठी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती, ती न्यायालयाने स्वीकारली. यामुळे युवराजला शनिवारी हांसी पोलीस ठाण्यात अटक झाली, जिथे पुन्हा काही काळ त्याची चौकशी करण्यात आली. यानंतर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून पोलिसांनी औपचारिकता पूर्ण करून युवराजची जामिनावर सुटका केली.

2017 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला

2000 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणाऱ्या युवराज सिंगने 2017 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला आणि 2019 मध्ये क्रिकेटला अलविदा म्हटले. आपल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत युवराजने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी सुमारे 12,000 धावा केल्या आणि 150 विकेट्सही घेतल्या. 2007 मध्ये टी -20 विश्वचषक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता आणि दोन्ही विजयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

संबंधित बातम्या

टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

HBD Anil Kumble : पाकिस्तानविरुद्ध कसोटीच्या एकाच डावात 10 विकेट, BCCI कडून अनिल कुंबळेच्या विक्रमाची उजळणी

Yuvraj Singh arrested and released by Haryana police, FIR filed against Chahal for using insulting words

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.