HBD Anil Kumble : पाकिस्तानविरुद्ध कसोटीच्या एकाच डावात 10 विकेट, BCCI कडून अनिल कुंबळेच्या विक्रमाची उजळणी

माजी भारतीय कर्णधार आणि अनुभवी लेग स्पिनर अनिल कुंबळे याचा आज 51 वा वाढदिवस आहे. यानिमित्त बीसीसीआयने कुंबळेने कसोटीच्या एका डावात सर्व 10 विकेट घेतल्याचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे.

HBD Anil Kumble : पाकिस्तानविरुद्ध कसोटीच्या एकाच डावात 10 विकेट, BCCI कडून अनिल कुंबळेच्या विक्रमाची उजळणी
Anil Kumble

नवी दिल्ली : माजी भारतीय कर्णधार आणि अनुभवी लेग स्पिनर अनिल कुंबळे याचा आज (17 ऑक्टोबर) 51 वा वाढदिवस (Anil Kumble Birthday) आहे. यानिमित्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कुंबळेने कसोटीच्या एका डावात सर्व 10 विकेट घेतल्याचा (Anil Kumbles 10 Wicket Haul) एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. (BCCI shared video of Anil Kumble took 10 wicket haul against pakistan in 1999 delhi test o his 51st birthday)

कुंबळेने 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दिल्ली कसोटीत हा पराक्रम केला होता. त्यावेळी कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वच्या सर्व 10 विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी इंग्लंडच्या जिम लेकरने 1956 च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मँचेस्टर कसोटीत हा करिश्मा केला होता.

कुंबळेचा जुना व्हिडिओ शेअर करताना बीसीसीआयने लिहिले, “403 आंतरराष्ट्रीय सामने, 956 विकेट. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 10 बळी घेणारा दुसरा गोलंदाज. टीम इंडियाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. चला पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या 10 विकेट्सच्या शानदार विक्रमावर एक नजर मारू.”

कुंबळेच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 956 विकेट्स

कुंबळे सध्या आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जचा मुख्य प्रशिक्षक आहे. मात्र, आयपीएल 2021 त्याच्यासाठी आणि संघासाठी चांगले नव्हते. त्याचा संघ प्लेऑफसाठी पात्र होऊ शकला नाही आणि सहाव्या स्थानावर राहिला. कुंबळेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2016-17 मध्ये पाच कसोटी मालिका जिंकल्या. त्याच्या नेतृत्वात भारताने 17 पैकी 12 कसोटी सामने जिंकले तर फक्त एक सामना गमावला होता.

कुंबळेची कामगिरी

या दिग्गज लेग स्पिनरने 132 कसोटीत 29.65 च्या सरासरीने 619 विकेट आणि एकदिवसीय सामन्यात 30.9 च्या सरासरीने 337 विकेट्स घेतल्या आहेत. तो मुरलीधरन (800), शेन वॉर्न (708) आणि जेम्स अँडरसन (632) नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.

युवराज सिंहकडून शुभेच्छा

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानेदेखील अनिल कुंबळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. युवराजने ट्विट केले आहे की “नाव आणि प्रसिद्धी दोन्ही बाबतीत जम्बो! तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. महान खेळाडू आणि व्यक्ती. आशा आहे की येणारे वर्ष आनंद, चांगले आरोग्य आणि यशाने भरलेले असेल. खूप प्रेम आणि शुभेच्छा.”

इतर बातम्या

T20 World Cup मध्ये 7 भारतीय क्रिकेटपटूंचं पदार्पण, पाकिस्तानला भिडून चौघे दाखवणार रुबाब

T20 World Cup मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताला खास संदेश, दिग्गज भारतीय क्रिकेटपटू काय म्हणाला?

आधी तोरा मिरवला पण शेवटी वठणीवर आले, पाकड्यांच्या जर्सीवर आता सन्मानाने दिसतोय ‘इंडिया’

(BCCI shared video of Anil Kumble took 10 wicket haul against pakistan in 1999 delhi test o his 51st birthday)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI