T20 World Cup मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताला खास संदेश, दिग्गज भारतीय क्रिकेटपटू काय म्हणाला?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Oct 16, 2021 | 11:10 PM

आगामी टी20 विश्वचषकाला 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. दरम्यान भारताचा पहिला सामना हा 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे.

T20 World Cup मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारताला खास संदेश, दिग्गज भारतीय क्रिकेटपटू काय म्हणाला?
भारत विरुद्द पाकिस्तान

Follow us on

मुंबई: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या क्रिकेट जगतातील सर्वात कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना हा कायमच जोशपूर्ण असतो. दोन्ही देशाचे करोडो नागरिक आतुरतने या सामन्याची वाट पाहत असतात. आताही तब्बल 2 वर्षानंतर हा सामना पुन्हा पार पडणार आहे. आगामी टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमने सामने असतील. 24 ऑक्टोबर रोजी दोन्ही संघ एकमेंकाविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करतील. दरम्यान या महत्त्वाच्या आणि भव्य सामन्यासाठी भारताचा माजी दिग्गज गोलंदाज अजित आगकरने (Ajit Agarkar) भारतीय संघाला एक सल्ला दिला आहे.

आगरकरच्या मते दोन्ही संघाचा सध्याचा फॉर्म पाहता भारतासाठी पाकिस्तानचं आव्हान जास्त मोठं नसलं तरी भारताला पाकिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही. 2007 साली भारताने टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला मात दिली होती. या संघाचा भाग असणाऱ्या आगरकर स्टार स्पोर्ट्सचा शो ‘क्लास ऑफ 2007’ मध्ये बोलताना म्हणाला,“भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हाही मॅच असते दोन्ही संघावर दबाव असतो. सध्याचा भारतीय संघ पाहता पाकिस्तानचं आव्हान मोठं नसलं तरी त्यांना हलक्यात घेण्याची चूक भारताने करु नये. हा टी20 सामना असल्याने कधीही काहीही बदलू शकते.”

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

हे ही वाचा

पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शाहिद अफ्रिदीने शेअर केला विराटचा व्हिडीओ, म्हणाला…

T20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराची कमाल, ख्रिस गेलचा रेकॉर्ड तोडला, विराटलाही मागे टाकत बाबरने रचला इतिहास

T20 WC 2021 : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची रंगत वाढली, स्टेडियममधील फॅन्सच्या एंट्रीला ग्रीन सिग्नल

(Ex Indian Cricketer Ajit agarkar says india should not take pakistan lightly in ICC t20 world Cup)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI