अक्षर पटेल मुख्य संघातून राखीव खेळाडूंमध्ये जाण्यामागे हार्दीक पंड्या, वाचा नेमकं प्रकरण काय?

भारतीय संघ विश्वचषकासाठी संपूर्णपणे तयार झाला आहे. सध्या सुरु असलेल्या सराव सामन्यात खेळाडूंचा खेळ पाहून मुख्य सामन्यांमध्ये कोणाला अंतिम संघात संधी मिळणार? हे ठरणार आहे.

अक्षर पटेल मुख्य संघातून राखीव खेळाडूंमध्ये जाण्यामागे हार्दीक पंड्या, वाचा नेमकं प्रकरण काय?
हार्दीक पंड्या आणि अक्षर पटेल

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ (Team India) विश्वचषकासाठी संपूर्णपणे तयार झाला असून सराव सामने सुरु आहेत. भारतीय संघाने बराच काळ आधी विश्वचषकासाठी संघ जाहीर केला असून त्यात केवळ एकच बदल केला. तो म्हणजे अक्षर पटेलला राखीव खेळाडूंमध्ये टाकत राखीव खेळाडूंमधून शार्दूलला मुख्य संघात घेण्यात आलं. दरम्यान या बदलामागे या मुख्य कारण हार्दीक पंड्या हा आहे. आता ते कसं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भारतीय संघात सुरुवातीपासूनच फलंदाज आणि वेगवान गोलंदाज अशा प्रकारच्या अष्टपैलू खेळाडूंची वाणवा आहे. दिग्गज खेळाडू कपिल देव यांच्यानंतर त्या प्रतिचा एकही खेळाडू भारताला मिळाला नाही. पण अलीकडे एक नाव भारतीय क्रिकेट संघात आलं ज्याने गोलंदाजीत विकेट घेण्यासह धडाकेबाज फलंदाजीही केली. हा खेळाडू म्हणजे हार्दीक पंड्या (Hardik Pandya).

पण अलीकडे हार्दीक दुखापतीमुळे गोलंदाजी करत नाही. तो विश्वचषकापर्यंत फिट होऊन गोलंदाजीसह फलंदाजी करेल असे सर्वांना वाटले. पण आयपीएलनंतर हे स्पष्ट झाले की सध्या तरी तो गोलंदाजी करण्यासाठी फिट नाही. अशावेळी संघात एका अष्टपैलू खेळा़डूची गरज होती. त्यामुळे शार्दूलला संघात घेण्यात आलं. पण पंड्यासारखा फिनिशर संघातून वगळणे परवडण्यासारखे नसल्याने फिरकीपटू असणारा अष्टपैलू खेळाडू अक्षरला संघातून कमी करण्यात आलं. त्यामुळे आता हार्दीक फलंदाज म्हणून खेळणार असून शार्दूलला अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळवले जाईल.

धोनीच्या अनुपस्थितीत पंड्यावर मोठी जबाबदारी

टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून या प्रकारात स्फोटक फलंदाज आणि फिनीशरची जबाबदारी फार मोठी असते. त्यातच भारताचा फिनीशर अर्थात माजी कर्णधार दोनी याने निवृत्ती घेतल्यामुळे सध्या फिनीशर म्हणून सर्व जबाबदारी हार्दीक पंड्यावरच आहे. त्यामुले आगामी विश्वचषकाबद्दल बोलताना पंड्या म्हणाला, ”हे माझ्या कारकिर्दीतील फार मोठं आव्हान असणार आहे. यंदा संघात महेंद्र सिंह धोनी नाही त्यामुळे माझ्या खांद्यावर फार जबाबदारी असणार आहे.”

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दीक पंड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

हे ही वाचा

…नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यास भारताला मोठं नुकसान, दंडही भरावा लागू शकतो

(Hardik Pandya is reason behind Akshar out of main Indian team for T20 World Cup and Shardul got in)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI