AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?

टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजचे सामने सुरु आहेत. पण सर्व भारतीयांच्या नजरा या 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडेच लागून आहेत.

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 3:34 PM
Share

मुंबई: सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉर्मेटमध्ये अव्वल क्रमाकांचा फलंदाज म्हटलं तर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचच नाव डोळ्यासमोर येतं. सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक रेकॉर्ड्स करणारा भारतीय असणाऱ्या विराटला एका रेकॉर्डपासून मात्र अद्यापर्यंत दूर राहावं लागलं आहे. ज्याची तो मागील अनेक वर्ष वाट पाहत असून यंदाच्या टी20 विश्वचषकात तरी तो हा रेकॉर्ड नावे करतो का? हे पाहावे लागेल.

तर हा रेकॉर्ड म्हणजे टी20 सामन्यात शतक झळकावण्याचा आहे. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये  सर्वाधिक शतकं नावावर असलेल्या विराटने वनडेमध्ये 43 आणि टेस्ट सामन्यांत 27 अशी एकूण 70 शतकं लगावली आहेत. पण टी20 क्रिकेटमध्ये तो एकही शतक लगावू शकलेला नाही. त्यामुळे त्याने आता या टी20 विश्वचषकात एकही शतक लगावल्यास तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक लगावण्याचा रेकॉर्ड करेल.

चौथा भारतीय बनण्याचा मान

विराटने यंदा शतक लगावल्यास तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक लगावणारा चौथा भारतीय बनेल. याआधी रोहित शर्मा, केएल राहुल आणि सुरेश रैना या तिघांनी ही कामगिरी केली असून आता विराटने शतक लगावल्यास तोही यांच्या पंगतीत स्थान मिळवेल. सध्या विराटचा सर्वोच्च टी20 स्कोर 94 इतका आहे.

टी20 मध्ये विराटची लय उत्तम

टी20 क्रिकेटचा विचार करता विराटचा रेकॉर्ड तसा उत्तम आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वााधिक धावा विराटच्याच नावे असून त्याने 3 हजार 159 धावा केल्या आहेत. तसंच सर्वाधिक अर्धशतकंही कोहलीच्याच नावे आहेत. विशेष म्हणजे यंदा तो टी20 विश्वचषकात शतक लगावल्यास नवा रेकॉर्ड तर करेलच. पण सोबतच शतकांचा दुष्काळही संपवेल. विराटने मागील 2 वर्ष एकही शतक लागवलेलं नाही. अखेरचं शतक त्याने नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध कोलकाता येथील कसोटीत लागवलं होतं.

हे ही वाचा

रवी शास्त्री दिसणार जुन्या भूमिकेत, फलंदाजी प्रशिक्षकांची नजर प्रमोशनवर? जाणून घ्या BCCI सोबतचा करार संपल्यानंतरचं प्लॅनिगं

T20 World Cup स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी थरारक सामना, स्कॉटलंडचा बांगलादेशवर निसटता विजय

राहुल द्रविड टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक होणार असल्याच्या चर्चा; विराट कोहली म्हणाला…

(Will Virat kohli score first T20 Century in India vs Pakistan match at T20 World Cup 2021)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.