रवी शास्त्री दिसणार जुन्या भूमिकेत, फलंदाजी प्रशिक्षकांची नजर प्रमोशनवर? जाणून घ्या BCCI सोबतचा करार संपल्यानंतरचं प्लॅनिगं

टीम इंडियासोबतचा करार संपल्यानंतर रवी शास्त्री काय करणार हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे. टी - 20 विश्वचषकानंतर, जेव्हा ते भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची खुर्ची सोडतील, तेव्हा त्यांच्या भविष्याचे काय होईल, यावरुन आता पडदा हटू लागला आहे.

रवी शास्त्री दिसणार जुन्या भूमिकेत, फलंदाजी प्रशिक्षकांची नजर प्रमोशनवर? जाणून घ्या BCCI सोबतचा करार संपल्यानंतरचं प्लॅनिगं
Ravi Shastri

मुंबई : टीम इंडियासोबतचा करार संपल्यानंतर रवी शास्त्री काय करणार हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे. टी – 20 विश्वचषकानंतर, जेव्हा ते भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची खुर्ची सोडतील, तेव्हा त्यांच्या भविष्याचे काय होईल, यावरुन आता पडदा हटू लागला आहे. रवी शास्त्रींबरोबरच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचीही योजना स्पष्ट असल्याचे दिसते. राठोड सध्या प्रमोशनकडे डोळे लावून बसले आहेत. ते रवी शास्त्रींची खुर्ची मिळवण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. ते लवकरच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करू शकतात, अशी माहिती आहे. (Ravi Shastri will back to commentary, Batting coach Vikram Rathour looking for promotion)

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्य प्रशिक्षकांव्यतिरिक्त, संघाचे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदांसाठीही अर्ज मागवले जात आहेत. मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. फलंदाजी प्रशिक्षकासाठी अर्ज 3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारले जातील, तर गोलंदाजी प्रशिक्षकाची अंतिम मुदतही 3 नोव्हेंबर आहे.

विक्रम राठोडांची नजर प्रमोशनवर

रवी शास्त्री मे 2022 मध्ये 60 वर्षांचे होतील. सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण डिसेंबरमध्ये 59 वर्षांचे होतील. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड 52 वर्षांचे असतील तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर 51 वर्षांचे आहेत. सर्वांच वय पाहिल्यास ते सर्व पुन्हा अर्ज करण्यास पात्र आहेत. पण, विक्रम राठोड वगळता, त्यापैकी कोणीही कोणत्याही प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यात स्वारस्य दाखवले नाही.

विक्रम राठोड यांनी ऑगस्ट 2019 मध्ये टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाच्या खालच्या फळीची फलंदाजीही सुधारली आहे. 2 वर्षे संघासोबत घालवल्यानंतर, त्यांनी खेळाडूंना वैयक्तिकरित्याही बरेच ओळखले आणि समजून घेतले. अशा स्थितीत ते पुन्हा संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकासाठी अर्ज करणार असल्याची बातमी आहे. पण ते मुख्य प्रशिक्षकासाठीही अर्ज करू शकता.

रवी शास्त्री कॉमेंट्री किंवा IPL मध्ये दिसणार

दुसरीकडे, रवी शास्त्री यांच्याबद्दल अशी बातमी आहे की, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची खुर्ची सोडल्यानंतर ते कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीमध्ये सामील होतील किंवा त्यांच्या जुन्या व्यवसायात प्रवेश करतील अर्थात कॉमेंट्री क्षेत्रात.

राहुल द्रविड टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक? विराट कोहली म्हणाला…

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) राहुल द्रविडला (Rahul Dravid)टी – 20 विश्वचषकानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाण्याच्या शक्यतेवर त्याचं मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला की, “याबाबतीत नेमकं काय घडत आहे, याची मला कल्पना नाही.” महान फलंदाज आणि माजी कर्णधार राहुल द्रविड सुरुवातीला या जबाबदारीसाठी तयार नव्हता पण बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) याबाबतीत थोडा जोर दिल्यानंतर राहुल द्रविड हे पद स्वीकारण्यास तयार झाल्याचे बोलले जात आहे.

इतर बातम्या

युवराज सिंगला हरियाणा पोलिसांकडून अटक अन् सुटका, चहलला अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल FIR

टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

T20 World Cup मध्ये 7 भारतीय क्रिकेटपटूंचं पदार्पण, पाकिस्तानला भिडून चौघे दाखवणार रुबाब

(Ravi Shastri will back to commentary, Batting coach Vikram Rathour looking for promotion)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI