AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यास भारताला मोठं नुकसान, दंडही भरावा लागू शकतो

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पूरस्कृत दहशतवाद्यांच्या ज्या कुरापत्या सुरु आहेत त्याच्या पार्श्वमीवर टी-ट्वेटी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केली होती.

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यास भारताला मोठं नुकसान, दंडही भरावा लागू शकतो
भारत विरुद्द पाकिस्तान
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 4:38 PM

नवी दिल्ली : टी20 विश्वचषकाला नुकतीच सुरुवात झाली असून सर्व भारतीयांच्या नजरा मात्र 24 ऑक्टोबर या तारखेवर आहेत. यादिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार असून या सामन्याची उत्सुकता शब्दात सांगता येण्यासारखी नक्कीच नाही. पण जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पूरस्कृत दहशतवाद्यांच्या ज्या कुरापत्या सुरु आहेत त्याच्या पार्श्वमीवर टी-ट्वेंटी स्पर्धेत भारत-पाकिस्तानचा सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केल्यानंतर हा सामना रद्द होतो का? असा प्रश्न फॅन्सना पडला आहे. पण याआधी एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा सामना रद्द झाल्यास याचा भारताला विश्वचषक या मानाच्या आणि महत्त्वाच्या स्पर्धेत फार तोटा होऊ शकतो.

हा सामना रद्द करण्याचे अधिकार आयसीसीकडे (ICC) आहेत. भारताने याआधी देखील अशाप्रकारे अनेकदा पाकिस्तानशी कोणतेच संबंध न ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. यान्वये आयपीएलमध्ये पाकचे खेळाडू न खेळवण्यापासून ते त्यांच्या दौऱ्यावर न जाणे आणि त्यांनाही दौैरा करु न देण्यासारखे प्रयत्न आहेत. सोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील भारताने पाकशी खेळण्यास नकार दिला होता. ज्यावर पाकिस्तान क्रिकेटने आक्षेप घेतला होता.

भारताला होईल मोठं नुकसान

समजा हा सामना रद्द झाला तर भारतीय संघाला मोठं नुकसान होऊ शकतं. तसंच दंडही भरावा लागू शकतो. नुकसान म्हणजे भारतीय संघाला न खेळताच पाकिस्तानला 2 गुण द्यावे लागतील. ज्यामुळे गुणतालिकेत आपोआपच भारत खाली आणि पाकिस्तान वर जाईल. ज्यामुळे पुढील फेरीत पोहोचणंही भारतासाठी आणखी अवघड होईल.

काश्मीरमध्ये गेल्या 10 दिवसांत 13 दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या 10 दिवसांमध्ये भारतीय सैन्याचे अतिरेक्यांसोबत 9 वेळा चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत 12 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत असलं तरी अतिरेक्यांच्या कारवाया काही कमी होताना दिसत नाहीय. पाकिस्तान पूरस्कृत दहशतवादी वारंवार काश्मीरमध्ये घुसखोरी करुन हिंसाचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

भारत-पाकिस्तान सामना नकोच, चित्रपट निर्माते अशोक पंडीत यांची मागणी

चित्रपट निर्माते आणि भारतीय चित्रपट-दूरचित्रवाणी दिग्दर्शक संघटनेचे अध्यक्ष अशोक पंडीत यांनी देखील भारत-पाकिस्तान सामना होऊ नये, अशी मागणी ट्विटरवर केली आहे. अशोक यांनी त्यांचा व्हिडीओ ट्विट करत ही मागणी केली आहे. यावेळी ते पाकिस्तानवर प्रचंड टीका करतात. पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले होत असताना भारत-पाकिस्तान सामना खेळवलं जाणं हे लज्जास्पद आहे, असं अशोक म्हणाले आहेत.

हे ही वाचा

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?

रवी शास्त्री दिसणार जुन्या भूमिकेत, फलंदाजी प्रशिक्षकांची नजर प्रमोशनवर? जाणून घ्या BCCI सोबतचा करार संपल्यानंतरचं प्लॅनिगं

T20 World Cup स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी थरारक सामना, स्कॉटलंडचा बांगलादेशवर निसटता विजय

(India Will Loss Alot if India vs Pakistan World cuo Match canceled)

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....