AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: अप्रतिम! 4 चेंडू 4 विकेट, आयर्लंडच्या कर्टिस कँफरचा नवा रेकॉर्ड, पाहा VIDEO

टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून आज ग्रुप स्टेजमधील नेदरलँड विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना आहे. या सामन्यात एक धमाकेदार रेकॉर्डही समोर आला आहे.

T20 World Cup 2021: अप्रतिम! 4 चेंडू 4 विकेट, आयर्लंडच्या कर्टिस कँफरचा नवा रेकॉर्ड, पाहा VIDEO
कर्टीस कॅंफर
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 5:40 PM

T20 World Cup 2021: टी20 विश्वचषकाला (T20 World Cup) सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजेसमधील सामने सुरु आहे. पण या सामन्यातूनच हा विश्वचषक किती धमाकेदार असणार आहे, याचा जणू ट्रेलरच दिसू लागला आहे. कारण सध्या सुरु असलेल्या नेदरलँड विरुद्ध आयर्लंड (Netharland vs Ireland) या जागतिक क्रिकेटमधील कमी ताकदीच्या संघामध्येच एक अत्यंत ताकदवर रेकॉर्ड समोर आला आहे. आयर्लंडचा गोलंदाज कर्टिस कँफर (Curtis Campher) याने नेदरलँडच्या 4 फलंदाजाना सलग 4 चेंडूवर तंबूत धाडलं आहे.

कर्टिसने तिन फलंदाजाना तर शून्यावर बाद करत एका षटकात सलग 4 चेंडूत 4 विकेट घेण्याचा नवा रेकॉर्डच त्याने नावे केला आहे. टी20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा कर्टिस पहिलाच खेळाडू आहे. तर आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात याआधी श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आणि अफगानिस्तानच्या राशिद खानने (Rashid Khan) 4 चेंडूत 4 विकेट्स घेण्याची कमाल केली आहे.

अशी केली कमाल

कर्टिसने डावातील 10 व्या षटकातही कमाल केली. त्याने दुसऱ्या चेंडूपासून पाचव्या चेंडूपर्यंत हे 4 बळी टिपले. कर्टीसने ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर कॉलिन एकरमॅनला 11 धावांवर नील रॉकच्या हाती झेलबाद केले. त्याने रियान टेन डोइशे आणि स्कॉट एडवर्ड्स यांना तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर पायचीत केले. ज्यानंतर पाचव्या चेंडूवर रूलोफ वॅन डेर मेर्वेला त्रिफळाचित करत त्याने दमदार रेकॉर्ड स्वत:च्या नावे केला.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

टी20 विश्वचषकात हॅट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज

याआधी राशिद खानने 2019 मध्ये आयर्लंड संघाविरुद्ध तर लसिथ मलिंगाने न्यूझीलंडविरुद्ध 4 चेंडूत 4 विकेट्स घेतले होते. तर टी 20 वर्ल्ड कपचा विचार करता आतापर्यंत तीन चेंडूवर तीन विकेट्सच पडल्या असून ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने 2007 मध्ये बांग्लादेशविरुद्ध ही कमाल केली होती. त्यानंतर आज कर्टिसने हॅट्रिकसह आणखी एक विकेट घेतला आहे.

हे ही वाचा

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यास भारताला मोठं नुकसान, दंडही भरावा लागू शकतो

T20 World Cup स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी थरारक सामना, स्कॉटलंडचा बांगलादेशवर निसटता विजय

(In T20 world cup 2021 in Ireland vs Netharlands match Irelands Curtis campher picked up 4 Wickets in 4 Balls new record set)

पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA.
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?.
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची...
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची....
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू.
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?.
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल.
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू.
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन.