
मोहाली | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेला गुरुवार 11 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर इब्राहिम झद्रान हा अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या हिशोबाने ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.