IND vs AFG | नववर्षातील पहिलीच टी 20 मालिका अफगाणिस्तान विरुद्ध, पाहा वेळापत्रक

India vs Afganistan | 2024 हे वर्ष टी 20 वर्ल्ड कपचं आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकूण 20 संघांमध्ये चांगलीच चढाओढ असणार आहे. टीम इंडिया या वर्षातील पहिली टी 20 मालिका अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे.

IND vs AFG | नववर्षातील पहिलीच टी 20 मालिका अफगाणिस्तान विरुद्ध, पाहा वेळापत्रक
| Updated on: Jan 05, 2024 | 6:51 PM

मुंबई | टीम इंडियासाठी 2023 हे वर्ष अप्रतिम राहिलं. टीम इंडियाने टेस्ट, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली. टीम इंडियाला 10 वर्षांपासूनची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा संपवण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाला त्यात काही यश आलं नाही. ऑस्ट्रेलियानेच टीम इंडियाला दोन्ही वेळा पाणी पाजलं. ऑस्ट्रेलियाने आधी टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभूत केलं. त्यानंतर वनडे वर्ल्ड कपमध्ये धुव्वा उडवला. या 2 सामन्यांचा अपवाद वगळता टीम इंडियाने वर्षभरात पैसा वसूल कामगिरी केली.

टीम इंडियाने 2023 या वर्षाची सांगताही ऐतिहासिक विजय मिळवून केली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील अखेरच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर आता टीम इंडिया नववर्षात जोरात सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. क्रिकेटसाठी टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने 2024 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे.

टीम इंडिया या वर्ल्ड कप मोहिमेच्या रंगीत तालीमीची सुरुवात ही अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजने करणार आहे. टीम इंडिया आणि अफगाणिस्तानची एकमेकांविरुद्ध टी 20 सारिज खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 17 जानेवारीला सांगता होणार आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला टी 20 सीरिजमध्ये पराभूत केलं. तर दक्षिण आफ्रिके विरुद्धची टी 20 मालिका बरोबरीत राखली. तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानने यूएई विरुद्ध टी 20 सीरिज जिंकलीय. त्यामुळे टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

रोहित-विराटची एन्ट्री!

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 मालिकेतून टीम इंडियात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची एन्ट्री होऊ शकते. तसचे रोहितला पुन्हा एकदा कर्णधारपदाची सूत्र मिळू शकतात. कारण नियमित कर्णधार हार्दिक पंड्या हा दुखापतग्रस्त आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या या टी 20 सीरिजसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी निवड समिती कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी देते आणि कुणाला पुन्हा एकदा निवडते, याकडेही क्रिकेट विश्वाचं लक्ष असेल.

टीम इंडियाची 2024 मधील पहिली टी 20 मालिका

टीम इंडिया-अफगाणिस्तान टी 20 सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 11 जानेवारी, मोहाली.

दुसरा सामना, 14 जानेवारी, इंदूर.

तिसरा सामना , 17 जानेवारी, बंगळुरु.