AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG: कॅप्टन गिल-पंत जोडीची कमाल, अफगाणिस्तान विरुद्ध 8 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक

India vs Afghanistan Only Test: ऋषभ पंत आणि शुबमन गिल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या डावात 550 पार मजल मारता आली. पंत आणि शुबमन या जोडीने भागीदारीसह ऐतिहासिक कामगिरी केली.

IND vs AFG: कॅप्टन गिल-पंत जोडीची कमाल, अफगाणिस्तान विरुद्ध 8 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक
Rishabh Pant and Shubman Gill Team IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Jun 07, 2026 | 9:19 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंडीगडमध्ये एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. अफगाणिस्तानने सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 113 धावा केल्या आहेत. त्याआधी टीम इंडियाने केएल राहुल आणि कर्णधार शुबमन गिल या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिला डाव हा 8 बाद 564 धावांवर घोषित केला. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 368 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी डाव घोषित करेपर्यंत टीम इंडियाने आणखी धावा करुन सामन्यावरील पकड आणखी मजबूत केली. शुबमन आणि ऋषभ या दोघांनी टीम इंडियासाठी पहिल्या डावात सर्वाधिक धावांची भागीदारी केली. यासह गिल आणि पंत जोडीने अफगाणिस्तान विरुद्ध 8 वर्षांआधीचा विक्रम मोडीत काढला. पंत आणि गिल जोडीने नक्की काय केलं? हे जाणून घेऊयात.

धवन आणि मुरलीचा रेकॉर्ड ब्रेक

शुबमनने टीम इंडियासाठी पहिल्या डावात सर्वाधिक धावा केल्या. शुबमन 126 धावांवर आऊट झाला. तर ऋषभ पंत याने 81 धावा केल्या. पंत बेजबाबदार फटका मारुन बाद झाला. शुबमन आणि ऋषभ या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 216 बॉलमध्ये 169 रन्सची पार्टनरशीप केली. यासह शुबमन-पंत या दोघांनी 2018 साली शिखर धवन आणि मुरली विजय या जोडीने अफगाणिस्तान विरुद्ध केलेल्या 168 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला. यासह शुबमन-ऋषभ अफगाणिस्तान विरुद्ध कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागादारी करणारी भारतीय जोडी ठरली.

ऋषभ पंतने मोठी संधी गमावली

ऋषभला अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या दिवशी शतक करण्याची संधी होती. मात्र पंतने शतकाची संधी गमावली. पंत पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर 50 धावांवर नाबाद परतला होता. त्यामुळे पंतकडून चाहत्यांना शतक अपेक्षित होतं. पंतने दुसऱ्या दिवशी संयमीपणे सुरुवात केली. पंत सहजपणे धावा जोडत शतकाच्या दिशेने आगेकूच करत होता. मात्र पंतने 81 धावांवर खेळत असताना अझमतुल्लाह ओमरझई याने टाकेलल्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. ऋषभ या प्रयत्नात कॅच आऊट झाला. शाहिदीने ऋषभचा कॅच घेतला. पंतने 121 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने 81 धावा केल्या. पंतची अशाप्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये 80 ते 99 धावांदरम्यान आऊट होण्याची ही 8वी वेळ ठरली.

मानव सुथारची कमाल

दरम्यान या सामन्यात डेब्यूटंट मानव सुथार यानेही आतापर्यंत कमाल कामगिरी करुन दाखवली आहे. मानवने अफगाणिस्तानला एकूण 3 झटके दिले. विशेष म्हणजे मानवने त्याच्या कारकीर्दीतील पहिल्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट मिळवली. मानव यासह कसोटी क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवणारा आठवा भारतीय गोलंदाज ठरला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...