IND vs AUS | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडेआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी

| Updated on: Mar 18, 2023 | 2:56 PM

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

IND vs AUS | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडेआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेल्या 189 धावांचं आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. सुरुवातील झटपट 5 विकेट्स गमावल्यानंतर टीम इंडियाच अडतणीत सापडली होती. मात्र यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. यादोघांनी 108 धावांची विजयी नाबाद भागादारी केली. केएल राहुल याने नाबाद 75 तर रविंद्र जडेजा याने 48 रन्सची खेळी. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

या मालिकेतील दुसरा सामना हा ऑस्ट्रेलियासाठी करो या मरो असा आहे. तर टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. मात्र टीम इंडियासाठी या साम्याआधी वाईट बातमी समोर आली आहे. दुसरा सामना हा 19 मार्च रोजी विशाखापट्टनम इथे खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे या सामन्यात पाऊस जोरदार बॅटिंग करण्याची शक्यता आहे.

वाय एस राजशेखर रेड्डी स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. रविवारी इथे जवळपास अडीच ते 3 तास पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसासह जोरदार वाऱ्याचा अंदाहही वर्तवला आहे. विशाखापट्टणममध्ये आज शनिवारीही 5 तास पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. पाऊस या सामन्यात व्हिलनची भूमिकेत दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

रोहित शर्माचं कमबॅक

दरम्यान या दुसऱ्या सामन्यातून रोहित शर्मा यांचं टीममध्ये कमबॅक होणार आहे. रोहितला पहिल्या सामन्यात कौटुंबिक कारणामुळे खेळता आलं नव्हतं. त्यामुळे रोहितच्या जागी हार्दिक पंड्याने याने नेतृत्वाची धुरा सांभाळली. मात्र आता उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल आणि जयदेव उनादकट.

टीम ऑस्ट्रेलिया | स्टीवहन स्मिथ (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स केरी, नाथन एलिस, कॅमरन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिश, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि एडम झॅम्पा.