AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS T20 : भारताला 91 धावांचं टार्गेट, रोहित, राहुल जोमात

IND vs AUS T20 : ऑस्ट्रेलियानं भारतासमोर आठ षटकांत 91 धावांचं लक्ष्य ठेवलं. पहिले फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं आठ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा केल्या. आता हे टार्गेट  भारताला गाठायचंय.

IND vs AUS T20 : भारताला 91 धावांचं टार्गेट, रोहित, राहुल जोमात
अक्षरची दमदार कामगिरी. Image Credit source: icc
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Sep 23, 2022 | 10:46 PM
Share

नागपूर : नागपुरात (Nagpur) ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा (IND vs AUS T20) सामना सुरु आहे. यावेळी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकात संघानं दोन गडी गमावले. विशेष म्हणजे या दोन्ही विकेट अक्षर पटेलच्या षटकात गेल्या. पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीनं कॅमेरून ग्रीनचा झेल सोडला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर भरपाई करताना ग्रीन धावबाद झाला. ग्रीन चार चेंडूत पाच धावा काढून बाद झाला. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलनं ग्लेन मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केलं. मॅक्सवेलला खातेही उघडता आलं नाही. ऑस्ट्रेलियानं आठ षटकात नव्वद धावा करून भारताला 91 धावांचं टार्गेट दिलंय.

इनिंग ब्रेक

वेड 20 चेंडूत 43 धावा करत नाबाद

जसप्रीत बुमराहनं पाचव्या षटकात कर्णधार फिंचला क्लीन बोल्ड केलं. फिंचला 15 चेंडूत 31 धावा करता आल्या. चार गडी बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडनं स्टीव्ह स्मिथसोबत पाचव्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी रचली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर स्मिथ धावबाद झाला. वेड 20 चेंडूत 43 धावा करून नाबाद राहिला.

हायलाईट्स

  1. वेडनं चार चौकार आणि तीन षटकार मारले.
  2. स्मिथ पाच चेंडूत आठ धावा करून बाद झाला.
  3. भारताकडून अक्षर पटलेवनं दोन षटकांत तेरा धावा देत दोन गडी बाद केले.
  4. बुमराहने दोन षटकांत 23 धावा देत एक विकेट घेतली.
  5. हार्दिक पांड्याने एका षटकात 10 धावा आणि युझवेंद्र चहलने एका षटकात 12 धावा दिल्या.
  6. हर्षल पटेल सर्वात महागडा ठरला. त्याने दोन षटकात 32 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.

अक्षरची हॅट्रिक हुकली

चौथ्या षटकात अक्षर पटेल पुन्हा गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. त्यानं सलग दोन चेंडूंवर मॅक्सवेल आणि डेव्हिडला बाद केलं.

आयसीसीचं ट्विट

ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर अक्षरनं टीम डेव्हिडला क्लीन बोल्ड केलं. डेव्हिडला तीन चेंडूत दोन धावा करता आल्या. मात्र, अक्षरची हॅटट्रिक हुकली.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती