KL Rahul: कॅच सोडून पण केएल राहुलच विकेटकीपर रहाणार असेल, मग त्या तिघांच काय? हा अन्याय नाही का?

| Updated on: Dec 05, 2022 | 1:27 PM

वनडे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून टीम इंडियाने बदलली रणनिती

KL Rahul: कॅच सोडून पण केएल राहुलच विकेटकीपर रहाणार असेल, मग त्या तिघांच काय? हा अन्याय नाही का?
केएल राहुल
Image Credit source: social
Follow us on

ढाका: पुढचा वर्ल्ड कप भारतात होणार आहे. 2023 वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंट भारतात रंगणार आहे. टीम इंडियाने आतापासून या वर्ल्ड कपसाठी तयारी सुरु केली आहे. संघबांधणी त्या दृष्टीने होणार आहे. पुढची वर्ल्ड कप स्पर्धा इशान किशन, संजू सॅमसन आणि ऋषभ पंतला कदाचित घरी बसून पहावी लागेल. उपकर्णधार केएल राहुलनेच तसे संकेत दिलेत. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल तसेच यष्टीरक्षणाची जबाबदारी संभाळेल.

या सामन्यात महत्त्वाची कॅच सोडली

त्यामुळे इशान, सॅमसन आणि पंतला संधी मिळण्याची शक्यता फार कमी दिसतेय. काल बांग्लादेश विरुद्ध पहिल्या वनडेत इशान किशन बेंचवर बसून होता. त्यावेळी राहुलकडे विकेटकीपिंगची जबाबदारी होती. राहुलने या सामन्यात महत्त्वाची कॅच सोडली. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.

पंतला का रिलीज केलं?

“मागच्या 6-7 महिन्यापासून आम्ही फार वनडे सामने खेळले नाहीयत. पण तुम्ही 2020-21 मध्ये पाहिलत, तर मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करुन यष्टीरक्षणाची जबाबदारी संभाळली आहे. टीमनेच मला ही जबाबदारी दिली आहे. पंतला का रिलीज केलं? ते कारण मला समजलेलं नाही. मेडीकल टीमच त्याबद्दल सांगू शकेल” असं केएल राहुल पत्रकार परिषदेनंतर म्हणाला.

….तरच दुसऱ्या विकेटकिपर्सना संधी

राहुल याच भूमिकेत राहिला, तर उर्वरित तीन योग्य विकेटकीपर्सना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही. टीम मॅनेजमेंट सूर्यकुमार यादवच्या समावेशाबद्दल गंभीर आहे. तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार असेल, तर संजू सॅमसन, इशान किशन आणि ऋषभ पंत बॅकअप विकेटकीपर्सच्या भूमिकेत राहतील. केएल राहुलला दुखापत झाली, तरच त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल.

भारताला मोठी किंमत चुकवावी लागली

काल बांग्लादेश विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात केएल राहुलने शार्दुल ठाकूर टाकत असलेल्या 43 व्या षटकात मेहदी हसन मिराजची महत्त्वाची कॅच सोडली. याच मिराजने नाबाद 38 धावांची खेळी करुन भारताला विजयापासून दूर ठेवलं. बांग्लादेशची शेवटची जोडी मैदानात होती, राहुलने कॅच घेतली असती, तर निकाल भारताच्या बाजूने लागला असता.