Video : ऋषभ पंतचा शॉट पाहून बेन स्टोक्स आश्चर्यचकीत, झालं असं की…

भारत इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारतीय फलंदाजांनी राज्य केलं. साई सुदर्शन वगळता इतर सर्वच फलंदाजांनी पहिल्या दिवशी धावांचं योगदान दिलं. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिलने तर टीम इंडियाला सावरलं.

Video : ऋषभ पंतचा शॉट पाहून बेन स्टोक्स आश्चर्यचकीत, झालं असं की...
Video : ऋषभ पंतचा शॉट पाहून बेन स्टोक्स आश्चर्यचकीत, झालं असं की...
Image Credit source: video grab/File
| Updated on: Jun 20, 2025 | 10:03 PM

लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली असली तर जबरदस्त कामगिरी केली. खरं तर पहिली गोलंदाजी घेत भारताचे विकेट झटपट काढण्याचा मानस होता. मात्र यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांच्या खेळीपुढे सर्व प्लान फेल गेला. भारताने पहिल्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी टीमला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. केएल राहुल बाद झाल्यानंतर आलेला साई सुदर्शन काही खास करू शकला नाही. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे संघावर दडपण वाढलं होतं. पण यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी 100हून अधिक धावांची भागीदारी केली. टी ब्रेकनंतर यशस्वी जयस्वालची विकेट काढण्यात इंग्लंडला यश आलं. त्यामुळे शेवटच्या सत्रात इंग्लंड कमबॅक करेल असं वाटत होतं. पण ऋषभ पंतने दुसऱ्या चेंडूवर आपला रंग दाखवला.

यशस्वी जयस्वाल बाद झाला आणि ऋषभ पंत मैदानात आला. स्टोक्स गोलंदाजी करत होता. त्याने यशस्वी जयस्वालला बाद केलं होतं. त्यामुळे दबाव होता. पंतने पहिला चेंडू ऑन साईडकडे खेळला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर पंत पुढे येऊन जोरदार प्रहार केला. पंत असं काही करू शकतो यावर बेन स्टोक्सला विश्वासच बसत नव्हता. त्याचा शॉट पाहून बेन स्टोक्स आश्चर्यचकीत झाला. त्यानंतर हसतच पंतजवळ गेला आणि काहीतरी कुजबुजला. हा संवाद माईकमध्ये कैद होऊ शकला नाही. कारण दोघेही स्टंपमाईकपासून दूर होते.

टीम इंडियाकडून पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वालने 159 चेंडूत 101 धावा केल्या. यात त्याने 16 चौकार आणि एक षटकार मारला. पण बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला. तर केएल राहुलने 78 चेंडूत 42 धावांची खेळी केली. तर साई सुदर्शन पदार्पणाच्या सामन्यातच फेल गेला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने दोन विकेट बाद केले. तर ब्रायडन कार्सला एक विकेट बाद करण्यात यश आलं.