
टीम इंडियाने इंग्लंडवर विजय मिळवून वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह टी वर्ल्ड कप 2022 सेमी फायनलच्या पराभवाचा वचपा काढला. टीम इंडियाने इंग्लंडचा 68 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी 172 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 103 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाची टी वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची ही तिसरी आणि 2014 नंतर पहिली वेळ ठरली. गतविजेत्या इंग्लंडचं या पराभवासह आव्हान संपु्ष्टात आलं. इंग्लंडचा कॅप्टन जॉस बटलर याने जाता जाता टीम इंडियाबाबत प्रतिक्रिया दिली.
इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 7 विकेट्स गमावून 171 धावा केल्या.पावसाने खोडा घातल्याने खेळं काही वेळ थांबवावा लागला. मात्र त्यानंतर खेळ सुरु झाला. टीम इंडियाकडून फिरकी गोलंदाजांनी उल्लेखनीय आणि विजयी कामगिरी साकारली. अक्षर पटेल आणि कुलदीप या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे इंग्लंडचा डाव आटोपला 103 धावांवर आटोपला. बटलर या पराभवानंतर टीम इंडियाबद्दल काय म्हणाला हे जाणून घेऊयात.
“टीम इंडियाने आमच्यावर पू्र्णपणे मात केली. आम्ही टीम इंडियाला 20-25 अतिरिक्त धावा करुन दिल्या. अशाप्रकारच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर ही धावसंख्या अवघड होती”, असं बटलरने म्हटलं. तसेच बटलरने 2 वर्षांपूर्वी टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पराभूत केलं होतं. बटलरने याबाबत प्रतिक्रिया दिली. “2 वर्षांआधी परिस्थिती वेगळी होती. याचं श्रेय भारताला जातं.ते विजयासाठी पात्र होते”, असं बटलरने म्हटलं.
जॉस बटलर काय म्हणाला?
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टोपले.