IND vs ENG Semi Final: टीम इंडिया-इंग्लंड आमनेसामने, रोहितसेना 2 वर्षांआधीचा वचपा घेणार?

India vs England Semi Final: टीम इंडियाला याच इंग्लंडने 2 वर्षांपूर्वी टी 20 वर्ल्ड कप 2022 सेमी फायनलमध्ये पराभूत केलं होतं. आता टीम इंडियाकडे 2 वर्षांआधीचा वचपा घेण्याची संधी आहे.

IND vs ENG Semi Final: टीम इंडिया-इंग्लंड आमनेसामने, रोहितसेना 2 वर्षांआधीचा वचपा घेणार?
England vs India cricket team
| Updated on: Jun 27, 2024 | 12:25 AM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना हा गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. या सामन्याचं आयोजन हे प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे करण्यात आलं आहे. रोहित शर्मा टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे. तर जॉस बटलरकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. टीम इंडिया इंग्लंडला सलग दुसऱ्यांदा सेमी फायनलमध्ये जाण्यापासून रोखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इंग्लंडने 2 वर्षांपूर्वी 2022 च्या टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाच्या प्रत्येक चाहत्याच्या मनात पराभवाची चिड आहे. टीम इंडियाने सुपर 8 मधील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वनडे वर्ल्ड कप 2023 च्या पराभवाचा वचपा घेतला. त्यामुळे आता रोहितसेनेने इंग्लंडला लोळवत 2 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करावा, अशी आशा चाहत्यांना आहे. त्यामुळे चाहत्यांना या सामन्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

इंग्लंडसमोर आव्हान काय?

तर इंग्लंडसमोर टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील 3 आणि सुपर 8 मधील 3 असे सलग 6 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाचा विजयरथ जोरात आहे. तसेच टीम इंडियाचे फलंदाज आणि गोलंदाजही धमाकेदार कामगिरी करत आहेत. अशात इंग्लंडसमोर टीम इंडियाचा हा विजयरथ रोखणं सोपं नसणार आहे. त्यामुळे इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड क्रिकेट टीम: जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, रीस टोपले आणि मार्क वुड.