IND vs ENG 3rd T20i : तिसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

India vs England 3rd T20i Live Streaming : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसर्‍या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार आहे? जाणून घ्या.

IND vs ENG 3rd T20i : तिसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
india vs england t20i series
Image Credit source: bcci
| Updated on: Jan 28, 2025 | 8:00 AM

टीम इंडिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध नववर्षातील पहिलीवहिली आणि टी 20i मालिका खेळत आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात जोस बटलरच्या इंग्लंडचा सलग 2 सामन्यात धुव्वा उडवत दणक्यात सुरुवात केली आहे. आता उभयसंघातील तिसऱ्या सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे. या तिसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? सामन्याचं आयोजन कुठे करण्यात आलं आहे? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20i सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20i सामना मंगळवारी 28 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20i सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20i सामना निरंजन शाह स्टेडियम, राजकोट येथे होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20i सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड तिसरा टी 20i सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी सुधारित भारतीय क्रिकेट संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे आणि रमणदीप सिंग.

टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.