Jasprit bumrah चा चेंडू लागून रोहित शर्मा वेदनेने विव्हळला, स्पर्धक बनताच बुमराह Mumbai Indians च्या टीम मधील मैत्री विसरला

| Updated on: Jun 24, 2022 | 9:07 AM

लीसेस्टरशायरच्या (India vs Leicestershire) गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला (Rohit sharma) होणारी दुखापत थोडक्यात टळली.

Jasprit bumrah चा चेंडू लागून रोहित शर्मा वेदनेने विव्हळला, स्पर्धक बनताच बुमराह Mumbai Indians च्या टीम मधील मैत्री विसरला
ind vs leic
Follow us on

मुंबई: इंग्लंड दौऱ्यावर दाखल झालेल्या (India England Tour) टीम इंडियाचा सध्या सराव सामना सुरु आहे. 1 जुलैपासून कसोटी सामना सुरु होईल. लीसेस्टरशायरने या सामन्यात चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने 8 विकेट गमावून 246 धावा केल्या आहेत. लीसेस्टरशायरच्या (India vs Leicestershire) गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला (Rohit sharma) होणारी दुखापत थोडक्यात टळली. रोहित शर्माला दुखापत पोहोचवणारा दुसरा-तिसरा कोणी नाही, तर त्याचाच संघातील सहकारी आहे.

बुमराहने रोहितला टाकला घातक चेंडू

भारताचे चार खेळाडू लीसेस्टरशायरच्या संघातून खेळतायत. यात जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे. भारतीय संघातील जास्तीत जास्त खेळाडूंना सराव मिळावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. काल रोहित फलंदाजी करताना जसप्रीत बुमराहला गोलंदाजी दिली होती. रेड बॉल फॉर्मेटमध्ये प्रथमच रोहित आणि बुमराह आमने-सामने आले होते. आयपीएलमध्ये दोघे मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात. नवव्या ओव्हरमध्ये रोहित स्ट्राइकवर होता. बुमराहने बाऊन्सर चेंडू टाकला. रोहितने पुढे येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्नात होता. पण चेंडू त्याच्या हाताला लागला. रोहित वेदनेने विव्हळला. तात्काळ भारतीय फिजियो मैदानात धावत आला. भारतासाठी चांगली बाब म्हणजे रोहितला गंभीर दुखापत झालेली नाही.

पहिल्यदिवस अखेर भारताच्या किती धावा?

पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने 8 विकेट गमावून 246 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे संपूर्ण दिवसात फक्त 60.2 षटकांचा खेळ होऊ शकला. श्रीकर भरतने सर्वाधिक 70 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी भरत 70 आणि मोहम्मद शमी 18 धावांवर खेळतोय. विराट कोहली, रोहित शर्मा आणि हनुमा विहारी सारखे दिग्गज फलंदाज अनुभवाने कमी असलेल्या इंग्लिश गोलंदाज रोमन वॉकर समोर ढेपाळले. वॉर्करने अजून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यु सुद्धा केलेला नाही. पण त्याने आपल्या गोलंदाजीने भारताच्या दिग्गज फलंदाजांना हैराण केलं.