
पल्लेकेले | आशिया कप 2023 मधील पाचव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध नेपाळ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. नेपाळला पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 238 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केलं. तर पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात शनिवार 2 सप्टेंबर रोजी झालेला सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पाकिस्तान आणि टीम इंडिया दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात आला. त्यामुळे सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्तवाचा आहे.
टीम इंडियाने या अतिशय महत्त्वाच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळ आणि टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये 1 बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोहम्मद शमी याची एन्ट्री झाली आहे. शमीला बुमराहच्या जागी संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह याला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशन हीने गोड बाळाला जन्म दिलाय. बुमराह बाबा होणार असल्याने तो 3 सप्टेंबरच्या रात्रीच श्रीलंकेतून भारतात परतला. त्यामुळे शमीला संधी मिळाली.
टीम इंडियाने टॉस जिंकला
🚨 Toss & Team News 🚨#TeamIndia have elected to bowl against Nepal.
A look at our Playing XI 🔽
Follow the match ▶️ https://t.co/i1KYESEMV1 #AsiaCup2023 | #INDvNEP pic.twitter.com/wX572GyE07
— BCCI (@BCCI) September 4, 2023
दरम्यान पल्लेकेले स्टेडियममध्ये गेल्या 5 सामन्यात टॉस जिंकून सर्व कर्णधारांनी बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र या नेपाळ विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
नेपाळ क्रिकेट टीम प्लेइंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलशन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी आणि ललित राजबंशी.