AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : रवींद्र जडेजाचा न्यूझीलंडविरुद्ध ‘पंजा’, वानखेडेत दिग्गजांना पछाडलं

Ravindra Jadeja Fifer India vs New Zealand 3rd Test : रवींद्र जडेजाने वानखेडे स्टेडियममध्ये 5 विकेट्स घेत न्यूझीलंडला ऑलआऊट करण्यात निर्णायक भूमिका बजावली. जडेजाने यासह पाकिस्तानच्या शोएब अख्तरचा रेकॉर्ड उद्धवस्त केला आहे.

IND vs NZ : रवींद्र जडेजाचा न्यूझीलंडविरुद्ध 'पंजा', वानखेडेत दिग्गजांना पछाडलं
ravindra jadeja fifer wankhede stadiumImage Credit source: bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 01, 2024 | 5:22 PM
Share

टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध मायदेशातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. भारतीय गोलंदांजी या तिसर्‍या सामन्यातील पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या तिघांनी न्यूझीलंडला 250 धावांच्या आत रोखण्यात यश मिळवलं. न्यूझीलंडचा पहिला डाव हा 65.4 ओव्हरमध्ये 235 रन्सवर आटोपला. न्यूझीलंडला गुंडाळण्यात रवींद्र जडेजाने सर्वात जास्त योगदान दिलं. तर सुंदर आणि आकाश दीपनेही चांगली साथ दिली.

रवींद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जडेजाने या 5 पैकी 4 विकेट्स या 2 ओव्हरमध्येच घेतल्या. जडजाने 2 षटकांमध्ये प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. जडेजाने विल यंग, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, इश सोढी आणि मॅट हॅन्री या 5 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जडेजाने मॅट हॅन्रीला आऊट करत वानखेडेत मोठा रेकॉर्ड ब्रेक केला.

जडेजाची कसोटी क्रिकेटमधील एका डावात 5 विकेट्स घेण्याची ही 14 वी वेळ ठरली. जडेजाने 77 व्या सामन्यात ही कामगिरी केलीय. जडेजाने यासह भारताचे माजी दिग्गज बिशनसिंह बेदी यांच्या 14 वेळा 5 विकेट्स घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. तर फझल महमूद, अँगस फ्रेझर, व्हर्नन फिलँडर, ख्रिस केर्न्स, मायकल होल्डींग, अँडी कॅडिक आणि साकेलन मुस्ताक यांना मागे टाकलं आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 12 वेळा 5 विकेट्स

दरम्यान शोएब अख्तरसह अनेक गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 12 वेळा 5 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये अख्तरसह, फीडल एडवर्ड्स, स्टूअर्ट मॅकगिल, सुभाष गुप्ते, मॉन्टी पानेसर, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि चामिंडा वास यांना ही कामगिरी केली आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेन्री, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा