IND vs PAK | पाकिस्तानच्या पराभवानंतर टीम डायरेक्टर मिकी आर्थर यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?

| Updated on: Oct 15, 2023 | 12:25 AM

Mickey Arthur On Bcci IND vs PAK | टीम इंडिया विरुद्ध पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानने बीसीसीआयवर टीका करत रडरड सुरु केली आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमचे डायरेक्टर मिकी आर्थर काय म्हणालेत बघा.

IND vs PAK | पाकिस्तानच्या पराभवानंतर टीम डायरेक्टर मिकी आर्थर यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?
Follow us on

अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्ताननंतर पाकिस्तानवर विजय मिळवलाय. टीम इंडियाचा हा वर्ल्ड कपमधील सलग तिसरा विजय ठरला. पाकिस्तानकडून मिळालेलं 192 धावांचं आव्हान हे टीम इंडियाने 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पाकिस्तानचा टीम इंडिया विरुद्धचा हा वर्ल्ड कपमधील आतापर्यंतचा सलग आठवा पराभव ठरला आहे. टीम इंडिया विरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने आता रडरड सुरु केली आहे. पाकिस्तान टीम डायरेक्टर मिकी आर्थर यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.

बीसीसीआयवर सडकून टीका

“आज रात्री असं वाटलं की ही स्पर्धा आयसीसीची नसून बीसीसीआयची आहे किंवा द्विपक्षीय मालिका आहे. मी इथे दिल दिल पाकिस्तान गाणं ऐकलं नाही. तसेच मी पराभूत झाल्याने मी बहाणेबाजी करत नाहीये”, असं म्हणत मिकी आर्थर  यांनी बीसीसीआयवर टीका केली.

टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मोठ्या संख्येत हजेरी लावली होती. संपूर्ण स्टेडियममध्ये निळ्या रंगाची जर्सीच दिसत होती. पाकिस्तानचे चाहते आणि पत्रकारांचीही या सामन्यासाठी भारतात येण्याची इच्छा होती. मात्र त्यांची इच्छा ही व्हीजामुळे पूर्ण होऊ शकली नाही.

मिकी आर्थर काय म्हणाले?

सामन्याचा धावता आढावा

दरम्यान टीमन इंडियाने पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही.पाकिस्तानने 42.5 ओव्हरमध्ये गाशा गुंडाळला. पाकिस्तानला 191 धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून कॅप्टन बाबर आझम याने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर मोहम्मद रिझवान याने 49 धावांची निर्णायक खेळी केली. पाकिस्तानने आपल्या अखेरच्या 8 विकेट्स या फक्त 36 धावांच्या मोबदल्यात गमावल्या.

टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद सिराज या पाचही जणांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर टीम इंडियाकडून रोहित शर्मा याने 86 धावांची खणखणीत खेळी केली. तर श्रेयस याने नॉट आऊट 53 रन्स केल्या. दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला चौथा सामना हा 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.