IND vs SA 2nd T20: मॅचआधी रोहित शर्मा ऑल ओक्के ना? नेमकं काय झालय?

IND vs SA 2nd T20: सगळी टीम एकत्र होती. पण रोहित शर्मा कुठेच नव्हता, कारण....

IND vs SA 2nd T20: मॅचआधी रोहित शर्मा ऑल ओक्के ना? नेमकं काय झालय?
rohit-sharma
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 02, 2022 | 12:25 PM

मुंबई: टीम इंडियाचा (Team india) आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा T20 सामना (IND vs SA) होणार आहे. गुवाहाटीमध्ये ही मॅच होणार आहे. या मॅचआधी रोहित शर्माची (Rohit sharma) चर्चा होती. कारण रोहित शर्मा टीमसोबत आला नव्हता. अखेर मॅचच्या काहीतास आधी रोहित शर्मा गुवाहाटीमध्ये पोहोचला आहे. टीम इंडिया गुरुवारीच गुवाहाटीमध्ये दाखल झाली होती. रोहित शर्मा टीमच्या दोन्ही प्रॅक्टिस सेशनला हजर नव्हता.

कुठे होता रोहित?

टीम इंडियाचा कॅप्टन बंधनकारक असलेल्या मॅचआधीच्या प्रेस कॉन्फरन्सलाही हजर नव्हता. त्याच्याजागी राहुल द्रविड या पत्रकार परिषदेला हजर होते. त्यामुळे कुठे होता रोहित? त्याला दुखापत झालीय का? गुवाहाटीच्या सामन्यात तो खेळणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

सूत्रांनी काय सांगितलं?

शनिवारी रात्री उशिरा रोहित गुवाहाटीमध्ये दाखल झाला. काही व्यक्तीगत कारणांमुळे रोहित टीमसोबत गुवाहाटीमध्ये आला नाही, असं इंडियन टीममधील सूत्रांच्या हवाल्याने इनसाइड स्पोर्ट्ने म्हटलं आहे. रोहित शर्माला कुठलीही दुखापत झालेली नाही किंवा दुसरा कुठलाही मुद्दा नाही. तो आजचा सामना खेळेल, असं सूत्रांनी सांगितलं.

रोहितचा काय उद्देश असेल?

आजच्या सामन्यात दमदार बॅटिंग करण्याचा रोहित शर्माचा इरादा असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही फ्लॉप ठरले होते.

आज संध्याकाळी 7 वाजता मॅच सुरु होईल. तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. जसप्रीत बुमराह या सीरीजमध्ये खेळत नाहीय. त्याच्याजाही मोहम्मद सिराजचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.