AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena: ‘ऑपरेशन टायगर’ची उद्धव सेनेला मुंबईत भीती? अकोल्यात सर्वात मोठा धक्का; निवडून आलेले 4 नगरसेवक शिंदे गटात

Akola Uddhav Thackeray Sena Setback: अकोला पाठोपाठ राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची उद्धव सेनेला भीती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौर्‍यावर होते. ते मुंबईत परतल्यापासून काहीतरी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच अकोल्यात उद्धव सेनेला मोठा झटका बसला आहे.

Shivsena: 'ऑपरेशन टायगर'ची उद्धव सेनेला मुंबईत भीती? अकोल्यात सर्वात मोठा धक्का; निवडून आलेले 4 नगरसेवक शिंदे गटात
अकोल्यात उद्धव सेनेला खिंडारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 18, 2026 | 1:03 PM
Share

गणेश सोनोने/प्रतिनिधी: अकोल्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या घडामोडी समोर आल्या आहेत. तर महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोठा राजकीय डाव साधला आहे. तर यात शिवसेना उबाठा गटाला अकोल्यात मोठा धक्का बसला असून, निवडून आलेल्या 6 नगरसेवकांपैकी तब्बल 4 नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत शिंदे गटात (Akola Uddhav Thackeray Sena Setback) प्रवेश केला आहे. अकोला पाठोपाठ राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची उद्धव सेनेला भीती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौर्‍यावर होते. ते मुंबईत परतल्यापासून काहीतरी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच अकोल्यात उद्धव सेनेला मोठा झटका बसला आहे.

चौघांनी धरली शिंदेसेनेची वाट

तर मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे या चार नगरसेवकांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला. शिवसेना नेते चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या नेतृत्वात प्रवेश झाला. तर या सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळे यांनीही शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामुळे हा राजकीय धक्का आणखी मोठा मानला जातो. दरम्यान, मनोज पाटील हे प्रहारचे महानगर अध्यक्ष असून त्यांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये उबाठासोबत युतीत निवडणूक लढवली होती. तर या पक्षांतरानंतर अकोल्यातील भाजप प्रणित शहर सुधार आघाडीची ताकद वाढली आहे. आता ही आघाडी स्वीकृत नगरसेवकांसह एकूण संख्या 53 वर पोहोचली आहे.

आता उद्धव सेनेचे दोनच नगरसेवक

शहर आणि प्रभागाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला, असे या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे. तर या सर्व घडामोडींमुळे अकोल्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, उबाठा गटात आता केवळ 2 नगरसेवक उरले आहेत. सहा नगरसेवकातील चार नगरसेवक शिंदे गटात गेल्याने उद्धव सेनेला मोठा झटका बसला आहे. आता दोन नगरसेवक तरी उद्धव सेनेत राहतील का, की तेही त्यांचा मार्ग निवडतील यावर चर्चा सुरू आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी