IND vs SA T20i : सूर्यकुमार यादवची कॅप्टन म्हणून आकडेवारी कशी? पाहा

India vs South Africa T20i Series : रोहित शर्मा याने टी 20i वर्ल्ड कप 2024 विजयानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सूर्यकुमार यादव याची भारतीय टी 20i संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

IND vs SA T20i : सूर्यकुमार यादवची कॅप्टन म्हणून आकडेवारी कशी? पाहा
suryakumar yadav
Image Credit source: Bcci
Sanjay patil | Updated on: Nov 08, 2024 | 1:05 AM

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात बांगलादेशला मायदेशात 3 सामन्यांच्या मालिकेत क्लिन स्वीप केलं. टीम इंडियाने बांगलादेशवर 3-0 असा धमाकेदार विजय मिळवला. त्यानंतर टीम इंडियाची युवा ब्रिगेड ही दक्षिण आफ्रिकेला त्यांच्यात घरात आव्हान देण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 3 सामन्यांची टी 20I मालिका होणार आहे. या मालिकेला 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. बीसीसीआय निवड समितीने या मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तर सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. या मालिकेनिमित्ताने सूर्याची टी 20I फॉर्मेटमध्ये कर्णधार म्हणून कामगिरी कशी आहे? हे जाणून घेऊयात.

कर्णधार सूर्यकुमारची आकडेवारी

रोहित शर्मा याने टी 20i वर्ल्ड कप विजयानंतर राजीनामा दिला. त्यानंतर श्रीलंकेच्या दौऱ्याआधी सूर्यकुमार यादव याची पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर टीम इंडियाने सूर्याच्या नेतृत्वात खेळलेल्या दोन्ही मालिका या क्लिन स्वीपने जिंकल्या. भारताने श्रीलंकेला जुलै महिन्यात त्यांच्याच घरात 3-0 ने पराभूत केलं. भारताने श्रीलंकेविरुद्ध सलग 2 सामने जिंकले. तर तिसरा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. त्यानंतर भारताने मायदेशात बांगलादेशला 3-0 ने क्लिन स्वीप केलं.

Loading...

दक्षिण आफ्रिकेचा दौरा

तर सूर्यकुमारसाठी यंदा पूर्णवेळ कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच दौरा असणार आहे. सूर्याने याआधी डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील 3 टी 20i सामन्यांच्या मालिकेत भारताचं नेतृत्व केलं होतं. ती मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली होती. तर या मालिकेआधी ऑस्ट्रेलिया नोव्हेंबर 2024 मध्ये भारत दौऱ्यावर आली होती. सूर्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ती मायदेशातील 5 सामन्यांची टी 20i मालिका ही 4-1 ने जिंकली होती.

एकूणच सूर्यकुमार यादव याने भारताचं एकूण 4 टी 20i सामन्यांतील 14 सामन्यात नेतृत्व केलं आहे. त्यापैकी 1 सामना (दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा) हा पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताने या 13 पैकी तब्बल 11 सामने जिंकले आहेत. तर फक्त 2 वेळाच (ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका प्रत्येकी 1-1) पराभूत व्हावं लागलं आहे. सूर्याची कर्णधार म्हणून विजयी टक्केवारी ही 84.6 इतकी आहे. भारताने सूर्याच्या नेतृत्वात आतापर्यंत एकही टी 20i मालिका गमावलेली नाही. त्यामुळे आता सूर्यासमोर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा विक्रम असाच कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे.

दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, अवेश खान आणि यश दयाल.

T20I सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन सिमलेटन, रायन रिकेल लुथो सिपमला (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी) आणि ट्रिस्टन स्टब्स.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us