
टीम इंडियाने विराट कोहली आणि रोहित शर्मा या 2 कर्णधारांच्या नेतृत्वात सलग 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक दिली. भारताला दोन्ही वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. भारताला सलग दोन्ही वेळा टेस्ट वर्ल्ड कपने हुलकावणी दिली. मात्र भारताने आपल्या विरुद्ध प्रतिस्पर्धी संघाला सहजासहजी जिंकू दिलं नाही. भारताने अपवाद वगळता प्रतिस्पर्धी संघाला लढून जिंकण्यास भाग पाडलं. भारताने विराट कोहली आणि रोहित शर्मा याच्या नेतृत्वात कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र टीम इंडियाची गाडी गेल्या काही महिन्यांत ट्रॅकवरुन घसरली आहे. भारताला हेड कोच गौतम गंभीर याच्या कार्यकाळात वर्षभरात मायदेशात 3 पैकी 2 मालिकांमध्ये व्हाईटवॉश व्हावं लागलं. तसेच भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या गुवाहाटीतील दुसर्या कसोटी सामन्यातील पराभवामुळे 93 वर्षांत पहिल्यांदाच नको तसा दिवस पाहावा लागला. भारताची कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 400 धावांनी पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. भारताचा 0-2 ने धुव्वा ...