AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC : शुबमन गिल महारेकॉर्डसाठी सज्ज, बाबरला पछाडण्यासाठी इतक्या धावांची गरज

Shubman Gill IND vs SA Test Series 2025 : शुबमन गिल याला कसोटी मालिकेत महारेकॉर्ड करण्याची संधी आहे. शुबमनला त्यासाठी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम याचा रेकॉर्ड ब्रेक करावा लागणार आहे.

WTC : शुबमन गिल महारेकॉर्डसाठी सज्ज, बाबरला पछाडण्यासाठी इतक्या धावांची गरज
Shubman Gill and Babar AzamImage Credit source: PTI
| Updated on: Nov 12, 2025 | 8:35 PM
Share

टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपली तिसरी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया शुबमन गिल याच्या नेतृत्वात आतापर्यंत या साखळीत अजिंक्य आहे. भारताने इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर भारताने वेस्ट इंडिजचा मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत 2-0 ने सुपडा साफ केला. त्यानंतर आता शुबमन सेना या साखळीतील आपली एकूण तिसरी तर मायदेशातील दुसरी कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. उभयसंघात एकूण 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेचा श्रीगणेशा  14 नोव्हेंबरपासून होणार आहे. भारताचा ही मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. भारतीय कर्णधार शुबमन गिल याला या मालिकेत पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याला मागे टाकण्याची संधी आहे.

शुबमनकडे बाबरचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. बाबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज आहे. मात्र बाबरचा हाच रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी शुबमनला अवघ्या काही धावांचीच गरज आहे. त्यामुळे शुबमन याच मालिकेच बाबरला मागे टाकेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.

शुबमनने आतापर्यंत 2025-2027 या साखळीत एकूण 7 सामने खेळले आहेत. शुबमनने या साखळीपासूनच कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. शुबमनने या 13 डावांमध्ये 78.83 च्या सरासरीने 946 धावा केल्या आहेत. शुबमनने या दरम्यान 5 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावली आहेत. शुबमनला आता साखळीत 1 हजार धावांसाठी फक्त 54 धावांची गरज आहेत. शुबमन यासह या साखळीत 1 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल.

शुबमनच्या रडारवर बाबरचा रेकॉर्ड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम हा इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याच्या नावावर आहे. तर बाबर या यादीत सातव्या स्थानी आहे. बाबरने एकूण 3 हजार 129 तर शुबमनने 2 हजार 893 धावा केल्या आहेत. तर शुबमन गिल हा बाबरनंतर या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा आशियाई फलंदाज आहे. शुबमनने 39 सामन्यांमधील 72 डावांत 43.01 च्या सरासरीने 2 हजार 839 धावा केल्या आहेत. त्यामुळे बाबरला पछाडण्यासाठी शुबमनला आणखी 291 धावांची गरज आहे. शुबमनकडे या 291 धावा करण्यासाठी 2 सामने अर्थात 4 डाव आहेत.

जो रुटच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड

दरम्यान डब्ल्यूटीसी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड हा जो रुटच्या नाववर आहे. रुटने 126 डावांत 6 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रुटने 6 हजार 80 धावा केल्या आहेत. तसेच रुट या स्पर्धेच्या इतिहासात 5 हजार करणारा एकमेव फलंदाज आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...