IND vs SA : कसोटीच्या पहिल्याच दिवशी केएल राहुलची एकाकी झुंज, दक्षिण अफ्रिकेची मजबूत पकड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या साखळी फेरीतील भारत दक्षिण अफ्रिका मालिका सुरु आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील निकालामुळे गुणतालिकेवर मोठ फरक पडणार आहे. असं असताना पहिल्या दिवशी दक्षिण अफ्रिकेचं वर्चस्व दिसलं. केएल राहुल वगळता एकाही खेळाडूला तग धरता आला नाही.

IND vs SA : कसोटीच्या पहिल्याच दिवशी केएल राहुलची एकाकी झुंज, दक्षिण अफ्रिकेची मजबूत पकड
IND vs SA : दक्षिण अफ्रिकेत कसोटी जिंकण्याचं स्वप्न भंगणार! पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा उडाला रंग
| Updated on: Dec 26, 2023 | 8:46 PM

मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना सुरु असून पहिल्या दिवसावर दक्षिण अफ्रिकेची मजबूत पकड दिसली. नाणेफेकीचा कौल जिंकत दक्षिण अफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय दक्षिण अफ्रिकन गोलंदाजांनी सार्थकी लावला. दिग्गज खेळाडूंनी अफ्रिकन गोलंदाजासमोर अक्षरश: नांगी टाकली. त्यामुळे आता टीम इंडियाला उर्वरित दिवसात चमत्कार करावा लागेल. कारण पहिल्या दिवशी टीम इंडियाला 200 धावांचा टप्पाही गाठता आला नाही. संपूर्ण संघ अवघ्या धावांवर तंबूत परतला. त्यामुळे दक्षिण अफ्रिका पहिल्या डावात मोठा लीड घेईल असा अंदाज क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. पहिल्या दिवशीचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे थांबला. दिवसअखेर टीम इंडियाने 8 गडी बाद 208 धावा केल्या. केएल राहुल नाबाद 70 आमि मोहम्मद सिराजला 10 चेंडू खेळून खातंही खोलता आलं नाही.

भारताचा डाव

यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा या जोडीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण कर्णधार रोहित शर्मा पूल शॉट मारत नंद्रे बर्गरच्या हाती झेल देत बाद झाला. रोहित शर्मा 5 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर यशस्वी जयस्वालही काही खास करू शकला नाही. 17 धावा करून नंद्रे बर्गरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर शुबमन गिलं 2 धावा करून तंबूत परतला. श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला मात्र यश आलं नाही. श्रेयस रबाडाच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला. त्यानंतर विराट कोहली 38 धावा करून तंबूत परतला. जीवदान मिळूनही त्याचं रुपांत्या मोठ्या खेळीत करण्यात अपयश आलं.

रविचंद्रन अश्विन 8, तर शार्दुल ठाकुर 24 धावा करून बाद झाले. तर जसप्रीत बुमराह अवघी 1 धाव करून माघारी परतला. दक्षिण अफ्रिकेकडून कगिसो रबाडाने 5, नंद्रे बर्गरने 2 आणि मार्को यानसेननं 1 गडी बाद केला. त्यामुळे सकाळच्या सत्रात दोन गड्यांवर किती धावांची मजल गाठली जाईल याबाबत शंका आहे. केएल राहुलला एकाकी झुंज द्यावी लागणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नंद्रे बर्गर

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा