IND vs SA: विराटने केपटाऊन कसोटीत इंशात ऐवजी उमेशला का निवडलं? त्यामागे ‘हे’ कारण

सिराजच्या जागी उमेशला खेळवणार की, इशांतला हा प्रश्न होता. इशांतकडे 100 पेक्षा जास्त कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे इशांतला संधी मिळेल असे सर्वांनाच वाटत होते. पण विराटने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

IND vs SA: विराटने केपटाऊन कसोटीत इंशात ऐवजी उमेशला का निवडलं? त्यामागे हे कारण
(Photo: AFP)
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 2:41 PM

केपटाऊन: मालिकेचा निकाल निश्चित करणाऱ्या केपटाऊन कसोटीत टीम इंडियाने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. विराट कोहली संघात परतला असून हनुमा विहारीने संघातील स्थान गमावले आहे. दुसरा बदल आहे उमेश यादव. दुखापतग्रस्त मोहम्मद सिराजच्या जागी उमेश यादवला संधी दिली आहे. (IND vs SA Why Kohli preferred Umesh ahead of Ishant for Cape Town Test)

सिराजच्या जागी उमेशला खेळवणार की, इशांतला हा प्रश्न होता. इशांतकडे 100 पेक्षा जास्त कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे इशांतला संधी मिळेल असे सर्वांनाच वाटत होते. पण विराटने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने इशांतऐवजी उमेशला संघात स्थान दिले. संघात परतल्यानंतर विराटने पुन्हा एकदा टॉस जिंकला व इशांतच्या जागी उमेशची का निवड केली? ते सांगितले. “पावसावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. या स्टेडियममध्ये धावा नेहमीच महत्त्वाच्या ठरल्या आहेत. मी पूर्णपणे फिट आहे. मी विहारीच्या जागी आलोय. दुखापतीमुळे सिराज खेळणार नाहीय. उमेश त्याच्याजागी येणार आहे” असे कोहलीने सांगितले.

“उमेश दमदार गोलंदाजी करतो. त्याचबरोबर तो चांगला क्षेत्ररक्षक आणि फलंदाजी सुद्धा करु शकतो. उमेश आणि इशांतमध्ये एकाची निवड करणं अवघड होतं. परदेशात खेळताना प्रत्येक कसोटी जिंकण्याचा आमचा प्रयत्न असतो. हे सुंदर स्टेडियम असून आम्ही उत्साहित आहोत” असे कोहलीने सांगितले. दक्षिण आफ्रिकेने आपल्या विजयी संघात कुठलाही बदल केलेला नाही. भारताने तिन्ही कसोटीत नाणेफेक जिंकली आहे. सलग तिसऱ्यांदा भारताने दक्षिण आफ्रिकेला गोलंदाजी करायला लावली आहे.

(IND vs SA Why Kohli preferred Umesh ahead of Ishant for Cape Town Test)