
भारताने आज श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 574 धावांवर पहिला डाव घोषित केला. यावेळी रवींद्र जाडेजा 175 धावांवर खेळत होता.

रोहित शर्मा-राहुल द्रविड जोडीचा हा निर्णय अनेकांना पटलेला नसून सोशल मीडियावर यावर खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली.

सोशल मीडियावर यावर गमतीशीर पोट धरुन हसवणारे मीम्स व्हायरल झाले आहेत.

रवींद्र जाडेजाच्या या इनिंगची सचिन तेंडुलकर बरोबर तुलना करण्यात आली. 2004 मध्ये सचिन तेंडुलकर 194 धावांवर खेळत असताना असाच डाव घोषित करण्यात आला.

रवींद्र जाडेजाला द्विशतकापासून रोखल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये राहुल द्रविड आता या मूडमध्ये असतील, असं एका युजरने टि्वट केलं आहे.

रोहित शर्माशिवाय कोणी द्विशतकाजवळ पोहोचतो, त्यावेळी त्याची Reaction अशी असते. असं एका युजरने म्हटलं आहे.

मॅचचा दुसराच दिवस होता. मग रवींद्र जाडेजला द्विशतक का पूर्ण करु दिले नाही? रोहित शर्मा-राहुल द्रविडने नाराज केलं, असं एका युजरने म्हटलं आहे.

कोणी 200 रन्सजवळ पोहोचल्यानंतर रोहित शर्माची भावना अशी असते, असं एका युजरने म्हटलं आहे.

राहुल द्रविड यांना 200 धावांपासून काही प्रॉब्लेम आहे का? असं विचारत एका युजरने हा फोटो पोस्ट केला आहे.

एखादा फलंदाज द्विशतकाजवळ पोहोचत असतो तेव्हा, अशा भावना असतात. अक्षय कुमारचा हा फोटो पोस्ट करुन राहुल द्रविड यांना ट्रोल करण्यात आलं आहे.