Virat Kohli : विराट कोहली ‘सेंच्युरी किंग’, सचिन तेंडुलकर याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

| Updated on: Jan 15, 2023 | 9:25 PM

विराटने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात गुवाहाटीत 113 धावा केल्या. विराटने यासह सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर आता तिरुवअनंतपूरममध्ये नाबाद 166 धावा केल्या. हे शतक विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 74 वं शतक ठरलं.

Virat Kohli : विराट कोहली सेंच्युरी किंग, सचिन तेंडुलकर याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Follow us on

तिरुवअनंतपूरम : टीम इंडियाने श्रीलंकेवर तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह श्रींलेकेला 3-0 अशा फरकाने क्लीन स्वीप दिला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला 317 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 22 ओव्हरमध्ये 73 धावांवरच ऑलआऊट केलं. मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर त्याआधी शुबमन गिल आणि विराट कोहली याने शतकी खेळी केली. विराटने नाबाद 166 धावांची खेळी केली. विराटचं या मालिकेतील दुसरं शतक ठरलं. विराटने या शतकासह वर्ल्ड रेकर्ड केला आहे.

सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

विराटने टीम इंडियाचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. विराटने श्रीलंका विरुद्ध केलेलं शतक हे त्याच्या कारकीर्दीतील 46 वं शतकं ठरलं. तर श्रीलंके विरुद्धचं 10 वं शतक ठरलं. तसेच भारतातील हे 21 वं शतक ठरलं. विराटने यासह सचिन तेंडुलकर याचा भारतात सर्वाधिक शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

विराटने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात गुवाहाटीत 113 धावा केल्या. विराटने यासह सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर आता तिरुवअनंतपूरममध्ये नाबाद 166 धावा केल्या. हे शतक विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 74 वं, वनडेतील 46 वं तर भारतातील 21 वं वनडे शतक ठरलं. इतकंच नाही, तर विराटने श्रीलंका विरुद्ध 10 शतक ठोकलं. कोणत्याही टीम विरुद्ध सर्वाधिक वनडे शतकांचा हा रेकॉर्ड आहे.

हे सुद्धा वाचा

महेल जयवर्धनेला पछाडलं

विराटने या शतकी खेळी दरम्यान वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं. विराट श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला पछाडत सर्वाधिक धावा करणारा 5 फलंदाज ठरला. विराटच्या नावावर आता 12 हजार 588 धावांची नोंद आहे.

आता टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड

टीम इंडियाने श्रीलंकेवर टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये विजय मिळवला. त्यानंतर आता टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला 18 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि वॉशिंगटन सुंदर.

श्रीलंका प्लेइंग XI : दसुन शनाका (कॅप्टन), अविष्का फर्नांडो, एन. फर्नांडो, कुसल मेंडिस, आसेन बंडारा, चरिथ असालंका, वानिंदु हसारंगा, जेफरी वेंडरसे, कसुन रजित, चामिका करूणारत्ने आणि लाहिरू कुमारा.