IND vs SL T20 Live Streaming : राजकोटमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच श्रीलंका विरुद्ध भिडणार, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Jan 06, 2023 | 11:04 PM

टीम इंडियाने (Indian Cricket Team) हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही.

IND vs SL T20 Live Streaming : राजकोटमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच श्रीलंका विरुद्ध भिडणार, जाणून घ्या सर्वकाही
Follow us on

राजकोट : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी 7 जानेवारीला राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात केली. त्यानंतर श्रीलंकेने दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. आता राजकोटमध्ये जिंकणारी टीम सीरिजही जिंकेल. (ind vs sl 3rd t20i match live streming where when venue head to head know all details sri lanka tour of india 2023)

हार्दिक पांड्या या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. हार्दिकच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. हार्दिकच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने आयर्लंड आणि न्यूझीलंडचा पराभव केलाय. त्यामुळे राजकोटमधील सामना जिंकून हार्दिकचा मालिका विजयाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असेल. तसेच टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध एकदाही मायदेशात टी 20 मालिकेत पराभूत झालेली नाही. मायदेशात टीम इंडियाने श्रीलंका विरुद्ध 5 पैकी 4 टी 20 मालिकेत विजय मिळवलाय. तर एक मालिका ड्रॉ राहिली आहे.

टीम इंडियाची राजकोटमधील कामगिरी

टीम इंडियाने राजकोटमध्ये आतापर्यंत 4 टी 20 सामने खेळले आहेत. टीम इंडियाने 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया, 2019 मध्ये बांगलादेश आणि 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. तर 2017 मध्ये पहिल्यांदा या मैदानात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

हे सुद्धा वाचा

तिसरा सामना कुठे होणार?

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना हा 7 जानेवारीला शनिवारी खेळवण्यात येणार आहे.

सामना कधी आणि कुठे?

या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल, तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टी 20 मालिकेसाठी दोन्ही संघ

टीम इंडिया : हार्दिक पांड्या (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड़, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, ईशान किशन, जितेश शर्मा, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

टीम श्रीलंका : दसुन शनाका (कॅप्टन), पथुम निसंका, अविष्का फर्नांडो, चरित असलंका, धनंजय डी सिल्वा, वानिंदु हसरंगा, चामिका करुणारत्ने, सादीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, एशेन बंडारा, महीश तीक्षणा, दिलशान मदुशंका, कसुन राजिथा, दुनिथ वेल्लालेज, प्रमोद मदुशन, लाहिरू कुमारा आणि नुवान तुषारा.