Hardik Pandya : टीम इंडिया हार्दिकच्या पंड्याच्या कॅप्टन्सीत ‘ही’ हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी

| Updated on: Jan 07, 2023 | 4:36 PM

श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत (IND vs SL) हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलंय.

Hardik Pandya : टीम इंडिया हार्दिकच्या पंड्याच्या कॅप्टन्सीत ही हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी
Follow us on

राजकोट : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरी आणि निर्णायक टी 20 मॅच शनिवारी 7 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून दोन्हीपैकी एका संघाला मालिका विजयाची संधी आहे. टीम इंडियाने वानखेडे स्टेडियममध्ये श्रीलंकेला पराभूत करत नववर्षाची विजयी सुरुवात केली. त्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला नववर्षाची सुरुवात ही मालिका विजयाने करण्याची संधी आहे. तसेच कर्णधार म्हणूनही हार्दिकला अनोखी हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. (ind vs sl 3rd t20i team india have chance to win successively 3 t20i series under hardik pandya captaincy at rajkot)

हार्दिकची टी 20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची ही तिसरी वेळ आहे. आतापर्यंत हार्दिकने आयर्लंड आणि त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 2022 मध्ये नेतृत्व केलं आहे. इतकंच नाही, तर या मालिकांमध्ये टीम इंडियाला विजयीही केलं आहे. त्यामुळे आता जर तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला, तर हार्दिकची कर्णधार म्हणून टी 20 मालिकेतील विजयी हॅटट्रिक ठरेल.

हार्दिकची कर्णधार म्हणून आकडेवारी

हार्दिकने आतापर्यंत एकूण 7 टी 20 सामन्यात भारताचं नेतृत्व केलंय. यापैकी 5 वेळा टीम इंडियाचा विजय झालाय. एकदा पराभव झालाय. तर एक सामना टाय झालाय.

हे सुद्धा वाचा

हार्दिकने जून 2022 मध्ये आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये भारताला विजयी केलं. त्यानंतर जुलै महिन्यात विडिंज विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात हार्दिकने टीम इंडियाला विजयी केलं.

हार्दिकला त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या 2 सामन्यांच्या टी 20 मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली. हार्दिकच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर दुसरा सामना हा टाय झाला. त्यामुळे भारताने ही मालिका 1-0 ने जिंकली.

त्यानंतर आता श्रीलंका विरुद्धची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. यामुळे आता श्रीलंकेला तिसऱ्या सामन्यात पराभूत करत हार्दिकला नेतृत्वात विजयी हॅटट्रिक साजरी करण्याची संधी आहे.