
आशिया कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत जे कुणालाच जमलं नाही ते टीम इंडियाने करुन दाखवलं आहे. टीम इंडियाने सुपर 4 मधील सहाव्या आणि अंतिम सामन्यात 200 पार मजल मारली आहे. इंडिया यासह 17 व्या आशिया कप स्पर्धेत 200 धावा करणारी पहिली टीम ठरली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 203 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. टीम इंडियासाठी ओपनर अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या त्रिकुटाने सर्वाधिक धावा केल्या. तर इतरांनीही टीम इंडियाला 200 पार पोहचवण्यात योगदान दिलं. आता टीम इंडिया या धावांचा यशस्वी बचाव करत सलग सहावा विजय मिळवणार की श्रीलंका या स्पर्धेत जाता जाता शेवट गोड करणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
टीम इंडियासाठी शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या या दोघांनी निराशा केली. शुबमनने 4 आणि हार्दिकने 2 धावा केल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादव याला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र सूर्या पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. सूर्याने 12 धावा केल्या. टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या तिघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं.
अभिषेकने सुपर 4 मध्ये सलग तिसरं अर्धशतक ठोकलं. अभिषेकने 31 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 8 फोरसह 61 रन्स केल्या. विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने 23 बॉलमध्ये 23 सिक्स आणि 1 फोरसह 39 रन्स केल्या.
तिलक वर्मा आणि अक्षर पटेल या जोडीने सहाव्या विकेटसाठी नॉट आऊट 40 रन्सची पार्टनरशीप केली. या जोडीने केलेल्या या भागीदारीमुळे टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 202 धावांपर्यंत पोहचता आलं. अक्षर पटेल याने 15 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 21 रन्स जोडल्या. तर तिलक वर्मा याचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने अधुर राहिलं. तिलकने 34 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 49 धावा केल्या. श्रीलंकेकडून महीश तीक्षणा, चमीरा, वानिंदु हसरंगा, दासून शनाका आणि कॅप्टन चरिथ असलंका या 5 जणांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
श्रीलंकेसमोर 203 धावांचं आव्हान
Innings Break!
A comprehensive batting display as #TeamIndia post a strong 202/5, the highest total of the #AsiaCup2025
Scorecard – https://t.co/OVolZNi5K7 #INDvSL #AsiaCup2025 #Super4 pic.twitter.com/5dW7cVIA9W
— BCCI (@BCCI) September 26, 2025
दरम्यान श्रीलंकेने साखळी फेरीत सलग 3 सामने जिंकले. मात्र त्यानंतर श्रीलंकेला सुपर 4 मध्ये सलग 2 सामने गमवावे लागले. तर टीम इंडियाने सलग 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता श्रीलंका जाता जाता हा सामना जिंकून टीम इंडियाला सलग सहावा विजय मिळवण्यापासून रोखणार का? याासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे.