IND vs SL Asia Cup Final 2023 : भारत-श्रीलंका फायनल पावसाने रद्द झाली तर पाहा कोणाला करणार विजयी घोषित!

IND vs SL Final Asia Cup 2023 : आतापर्यंत भारतीय संघाने सातवेळा तर श्रीलका संघाने सहावेळा आशिया कपची फायनल फेरी गाठली आहे. या सामन्याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं  संकट असणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर विजयी संघ कोणता हे कसं ठरवणार? 

IND vs SL Asia Cup Final 2023 : भारत-श्रीलंका फायनल पावसाने रद्द झाली तर पाहा कोणाला करणार विजयी घोषित!
| Updated on: Sep 16, 2023 | 12:15 PM

मुंबई : आशिय कप 2023 मधील सुपर 4 फेरीमधील सामने झाले असून शेवटच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. आता आशिया कपच्या फायनलमध्ये आता भारत-श्रीलंका एकमेकांना भिडणार आहेत. आतापर्यंत भारतीय संघाने सातवेळा तर श्रीलका संघाने सहावेळा आशिया कपची फायनल फेरी गाठली आहे. या सामन्याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं  संकट असणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर विजयी संघ कोणता हे कसं ठरवणार?

सामना रद्द झाला तर…

भारत-श्रीलंका सामन्यामध्ये पावसाने खोडा घातला आणि रविवारी जर सामना नाही झाला तर फायनलसाठी एक दिवस राखीव ठेवला आहे.  भारत-श्रीलंका सामन्यामध्ये पावसाने खोडा घातला आणि रविवारी जर सामना नाही झाला तर फायनलसाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. 17 सप्टेंबरला हा सामना होणार असून त्या दिवशी पावसाने हजेरी लावली तर सामन्यासाठी राखीव दिवस 18 सप्टेंबर ठेवला आहे.

राखीव दिवशीही पाऊस आला तर…

सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे त्या दिवशीसुद्धा पावसाने हजेरी लावली तर फायनल विजेता कोण असणार? 18  सप्टेंबरलाही जर पाऊस आला आणि सामना नाही झाला तर दोन्ही संघांना विजेतेपद देण्यात येतं. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघाना आशिया कप 2023 चं विजेतेपद दोघांमध्ये वाटून देण्यात येणार आहे. याआधीही भारत आणि श्रीलंकेमध्ये अशा प्रकारे विजेतेपद दिलं आहे.

दरम्यान, 2002 साली झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत आणि श्रीलंका संघाने प्रवेश मिळवला होता. त्यावेळी पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता आणि भारत आणि श्रीलंका यांनी विजेतेपद शेअर केलं होतं. रविवारी 90% टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सोमवारी म्हणजेच 18 सप्टेंबरला 69 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.