AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : टीम इंडिया-विंडीज पहिल्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या

India vs West Indies 1st Test Live Streaming : आशिया कप जिंकल्यानंतर आता टीम इंडिया विंडीज विरुद्ध मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया विरुद्ध विंडीज यांच्यातील कसोटी मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे.

IND vs WI : टीम इंडिया-विंडीज पहिल्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या
India vs West Indies 1st Test Live StreamingImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 01, 2025 | 7:23 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेनंतर आता टीम इंडिया रेड बॉल क्रिकेटसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपल्या दुसऱ्या आणि मायदेशातील पहिल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज विरुद्ध 2 हात करणार आहे. उभयसंघात एकूण 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. शुबमन गिल याची कर्णधार म्हणून ही दुसरीच मालिका असणार आहे. शुबमनच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत राखली होती. त्यामुळे टीम इंडियाचा मायदेशात आणि डब्ल्यूटीसी 2025-2027 या साखळीत विंडीजला पराभूत करुन पहिली कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कुठे आणि कधी होणार? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

विंडीज 7 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर

दरम्यान वेस्ट इंडिज या दौऱ्यानिमित्ताने 7 वर्षांनंतर कसोटी मालिकेसाठी भारतात आली आहे. विंडीज याआधी 2018 साली भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हा टीम इंडियाने विंडीजला 2-0 अशा फरकाने पराभूत केलं होतं. त्यामुळे आता टीम इंडिया पुन्हा अशीच कामगिरी करण्यासाठी उत्सूक आहे. तर विंडीज टीम इंडियाला कशाप्रकारे आव्हान देणार? हे पाहणंही औत्सुक्यांचं ठरणार आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!