AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI 1st Test : Playing 11 बाबत रणनिती निश्चित, कॅप्टन शुबमनकडून अपडेट, म्हणाला..

India Playing 11 For 1st Test Against West Indies : शुबमन गिल कसोटी कर्णधार म्हणून एकूण दुसरी तर मायदेशातील पहिली मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया विरुद्ध विंडीज या मालिकेत एकूण 2 सामने खेळवण्यात येणार आहेत.

IND vs WI 1st Test : Playing 11 बाबत रणनिती निश्चित, कॅप्टन शुबमनकडून अपडेट, म्हणाला..
Shubman Gill Press ConferenceImage Credit source: ANI
| Updated on: Oct 01, 2025 | 3:48 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेनंतर आता भारतीय चाहत्यांना वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेचे वेध लागले आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. उभयसंघातील पहिला कसोटी सामना हा 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. प्रत्येक सामन्याआधी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना असते. कॅप्टन शुबमन गिल याने सामन्याच्या 1 दिवसआधी 1 ऑक्टोबरला प्लेइंग ईलेव्हनबाबत भाष्य केलं आहे.

विंडीज विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी शुबमनने प्लेइंग ईलेव्हनबाबत रणनिती सांगितली आहे. एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह खेळणार असल्याचे संकेत शुबमनने दिले आहेत. शुबमनने या व्यतिरिक्त आणखी काय काय सांगितलं? हे जाणून घेऊयात.

शुबमन काय म्हणाला?

“तुम्हाला उद्या (2 ऑक्टोबर) प्लेइंग ईलेव्हनबाबत समजेल. परिस्थिती आणि हवामान पाहता आम्ही 1 अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह खेळण्यासाठी तयार आहोत”, असं शुबममने पत्रकार परिषदेत म्हटलं.

जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट

शुबममने भारताचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याबाबतही भाष्य केलं आहे. बुमराह याआधी इंग्लंड दौऱ्यात वर्कलोड मॅनेजमेंटमुळे 5 पैकी 3 कसोटी सामन्यांमध्येच खेळला होता. त्यामुळे बुमराह विंडीज विरुद्ध किती सामन्यात खेळणार? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबतही शुबममने माहिती दिली.

“बुमराहला खेळवण्याबाबतचा निर्णय हा प्रत्येक सामान्यानंतर घेतला जाईल. बुमराहने एका कसोटी सामन्यात किती ओव्हर बॉलिंग केलीय? तसेच त्याला कसं वाटतंय? या निकषांवरुन बुमराहबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र अद्याप काहीही निश्चित नाही”, असंही शुबमनने नमूद केलं.

1 मालिका आणि 2 सामने

उभयसंघात एकूण 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिल्या सामन्यानंतर दुसरा आणि अंतिम सामना 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीत होणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीचा भाग आहे.

विंडीजला मालिकेआधीच 2 झटके

दरम्यान पाहुण्या वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला या मालिकेआधीच 2 झटके लागले आहेत. वेस्ट इंडिजच्या 2 खेळाडूंना दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. शामर जोसेफ आणि अल्झारी जोसेफ या दोघांना दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. हे दोघेही भारत दौऱ्यावर नसल्याने विंडीजच्या अडचणीत वाढ झाली आहे. शामर आणि अल्झारीच्या जागी 2 युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे.

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, सुप्रीम कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, सुप्रीम कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक