Ind vs WI : रोहित शर्मा याची ही गोष्ट अतीच झाली, भर सामन्यात इशान किशनला…पाहा Video
IND vs WI 1 Test : या सामन्यानमधील रोहित शर्माचे काही व्हिडीओ सोशल मीडियाव व्हायरल झाले. त्यामधील एक म्हणजे रोहितने बॅटींग करत असताना दिलेल्या शिवीचा, त्यानंतर आता आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे.

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 141 धावा डावाने विजय मिळवला आहे. तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाने कॅरेबियन संघाला पराभवाचं पाणी पाजलं. युवा खेळाडू पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल याला सामनवीर म्हणून गौरवण्यात आलं. या सामन्यामधील रोहित शर्माचे काही व्हिडीओ सोशल मीडियाव व्हायरल झाले. त्यामधील एक म्हणजे रोहितने बॅटींग करत असताना दिलेल्या शिवीचा, त्यानंतर आता आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे.
रोहित शर्मा इशान किशनवर भडकला?
कर्णधार रोहित शर्माने त्याचा मुंबई इंडियन्समधील सहकारी खेळाडू इशान किशनवर भडकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. टीम इंडियाने आपला डाव 421 धावांवर घोषित केला त्यावेळी मैदानामध्ये रविंद्र जडेजा आणि इशान किशन होते.
आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या किशनने बॅटींगला आल्यावर पहिली धाव काढण्यासाठी तब्बल 21 चेंडू घेतले. त्यामुळे रोहित शर्मा वैतागला भारताला आपला डाव घोषित करायचा होता पण विराट कोहली बाद झाल्यावर इशान किशला गेला. पहिलाच सामना असल्यामुळे त्याने खातं उघडल्यावर डाव घोषित करायचा असा रोहितचा प्लॅन असावा. पंरतु किशनने खातं उघडण्यासाठी 21 चेंडू घेतले त्यामुळे रोहितचा पारा चढल्याची माहिती समजत आहे.
पाहा व्हिडीओ :-
दरम्यान, भारताने आपला डाव 421 धावांवर घोषित केल्यावर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही फार काही कमाल केली नाही. आधी 150 आणि दुसऱ्या डावामध्येतर 130 धावांवरच कार्यक्रम गुंडाळला. आता दुसरा सामना 20 जुलैला सुरू होणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.