IND vs ZIM: टीम इंडियात एक बदल, दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी नवोदित खेळाडूला संधी

| Updated on: Aug 16, 2022 | 2:06 PM

IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी नवोदित खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे.

IND vs ZIM: टीम इंडियात एक बदल, दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी नवोदित खेळाडूला संधी
team india
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदचा संघात समावेश करण्यात आला आहे. शाहबाज आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. 27 वर्षाचा शाहबाज बंगालकडून क्रिकेट खेळतो. आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच प्रतिनिधीत्व करतो. वॉशिंग्टन सुंदरची भारतीय संघात झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाली होती. पण त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो या मालिकेला मुकणार आहे. त्याच्याजागी शाहबाज अहमदची निवड झालीय. इंग्लंड मध्ये काऊंटी क्रिकेट खेळताना फिल्डिंग दरम्यान वॉशिंग्टन सुंदरला ही दुखापत झाली होती. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदच्या निवडीवर भारतीय निवड समितीने शिक्कामोर्तब केलय. सिलेक्टर्सचा हा निर्णय थोडा हैराण करणारा आहे. कारण शाहबाजच्या नावाची कोणतीही चर्चा नव्हती.

शाहबाज अहमद डावखुरा खेळाडू

शाहबाज अहमद डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज आहे. तो चेंडू चांगला टर्न करतो. आयपीएल मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी खेळतो. पार्टनरशिप ब्रेक करणारा गोलंदाज म्हणून तो ओळखला जातो. तो एक चांगला ऑलराऊंडर आहे.

क्रिकेटच्या इंटरनॅशनल पीचवर अजून त्याने डेब्यु केलेला नाही. देशांतर्गत क्रिकेट मध्येही 26 लिस्ट ए चे सामने खेळला आहे. यात 24 विकेट घेऊन 662 धावा केल्या आहेत. शाहबाज 56 टी 20 आणि 18 फर्स्ट क्लास सामने खेळला आहे. 56 टी 20 सामन्यात त्याने 512 धावा आणि 39 विकेट घेतल्या आहेत. 18 फर्स्ट क्लास सामन्यात 1041 धावा आणि 57 विकेट घेतल्यात.

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचा कार्यक्रम

भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यात 3 सामन्यांची वनडे सीरीज खेळणार आहे. ज्यासाठी शाहबाज अहमदला रिप्लेसमेंट म्हणून निवडण्यात आलं आहे. भारत आणि झिम्बाब्वे मध्ये पहिला वनडे सामना 18 ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर दुसरी वनडे 20 ऑगस्टला आणि तिसरा वनडे सामना 22 ऑगस्टला होईल. हे तिन्ही सामने हरारे येथे होणार आहेत. शाहबाज अहमदला टीम इंडियात स्थान मिळालय. पण झिम्बाब्वे दौऱ्यात त्याला डेब्युची संधी मिळेल का? हे आताच ठामपणे सांगता येणार नाही.