AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM, Super 8 : टीम इंडियाचा जबरदस्त विजय, चेन्नईत झिंबाब्वेवर 72 धावांनी मात

India vs Zimbabwe Super 8 Match Result : टीम इंडियाच्या झिंबाब्वेवरील विजयामुळे दक्षिण आफ्रिकेला फायदा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील उपांत्य फेरीत अजिंक्य राहत धडक दिली आहे.

IND vs ZIM, Super 8 : टीम इंडियाचा जबरदस्त विजय, चेन्नईत झिंबाब्वेवर 72 धावांनी मात
Ishan Axar Hardik Team IndiaImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 26, 2026 | 11:17 PM
Share

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत आपला पहिलावहिला विजय मिळवला आहे.  टीम इंडिया आणि झिंबाब्वेला आपल्या सुपर 8 मोहिमेतील पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे टीम इंडिया आणि झिंबाब्वे या दोन्ही संघांसाठी एकमेकांविरुद्धचा सामना हा करो या मरो असा होता. मात्र टीम इंडियाने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये झिंबाब्वेवर एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाने झिंबाब्वेवर 72 धावांनी जबरदस्त असा विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. तर झिंबाब्वेचं पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.  तर भारताच्या विजयामुळे ए ग्रुपमधून दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहचली आहे. दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहचणारी दुसरी टीम ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेआधी इंग्लंडने सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे.  त्यामुळे आता 5 संघांमध्ये 2 जागांसाठी चुरस आहे.

टीम इंडियाचा पाचवा विजय

टीम इंडियाच्या पहिल्या 6 फलंदाजांनी विस्फोटक फलंदाजी केली. टीम इंडियाने या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 256 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात झिंबाब्वेनेही जोरदार प्रतिकार करत लढा दिला. झिंबाब्वेला हा सामना जिंकता आला नाही. मात्र झिंबाब्वेच्या फलंदाजांनीही आपली ताकद दाखवून दिली. झिंबाब्वेला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 184 धावांपर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाने यासह टी 20i क्रिकेटमध्ये धावांबाबत आपला दुसरा सर्वात मोठा विजय मिळवला.

भारताच्या फलंदाजांची जबरदस्त कामगिरी

टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. अभिषेकने 55 आणि हार्दिकने नाबाद 50 धावा केल्या. तिलक 44 रन्सवर नॉट आऊट राहिला. इशान किशन याने 38 तर कॅप्टन सूर्याने 33 धावांचं योगदान दिलं. तर संजू सॅमसन याने 24 रन्स केल्या. झिंबाब्वेसाठी 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

ब्रायन बेनटची चाबूक खेळी

झिंबाब्वेसाठी ओपनर ब्रायन बेनट याने धमाकेदार खेळी केली. ब्रायनने शेवटपर्यंत नाबाद राहत सर्वाधिक 97 धावा केल्या. ब्रायनने या खेळीत 6 सिक्स आणि 8 फोर ठोकले. कॅप्टन सिकंदर रझा याने 31 धावा करत फाईट दिली. मात्र इतरांना काही खास करता आलं नाही. भारतासाठी अर्शदीप सिंह याने 3 विकेट्स मिळवल्या. तर वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि शिवम दुबे या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्
Tiger Shroff Case : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट समोर; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्.....