
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट टीम आज इतिहास रचणार आहे. टीम इंडिया एशियन गेम्स 2023 मध्ये गुरुवारी आपला पहिला सामना खेळणार आहे. चीनच्या होंगझाऊमध्ये एशियन गेम्सच आयोजन करण्यात आलय. भारतीय क्रिकेट टीम पहिल्यांदा एशियन गेम्समध्ये उतरली आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमचा पहिला सामना मलेशिया विरुद्ध आहे. या ऐतिहासिक सामन्यात हरमनप्रीत कौर टीम इंडियाची कॅप्टन नसेल. तिच्याजागी स्मृती मांधना टीमच नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत थेट क्वार्टर फायनलमध्ये खेळत आहे. मलेशियाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय,. नऊ वर्षानंतर एशियन गेम्समध्ये पुन्हा क्रिकेट सुरु होत आहे. यापूर्वी 2014 साली एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण भारताने आपली टीम पाठवली नव्हती.
हरमनप्रीत कौरला टीमच कॅप्टन बनवलय. पण ती सुरुवातीचे दोन सामने खेळणार नाहीय. कारण आयसीसीने तिला दोन मॅचसाठी सस्पेंड केलय. हरमनप्रीत कौरने बांग्लादेश टूरवर अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. स्टम्पवर बॅट मारली होती. त्यामुळे तिला निलंबित करण्यात आलं होतं. आयसीसीमधील चांगल्या रँकिंगमुळे टीम इंडियाला थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळाला आहे. मलेशियाने हॉन्ग कॉन्गवर 22 धावांनी विजय मिळवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताकडून स्पिनर कनिका आहूजा आपला टी 20 डेब्यु करत आहे. तिच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील. शेफाली वर्मा आपल्या तुफानी बॅटिंगसाठी ओळखली जाते. या दोघींशिवाय अमनजोत कौर, मिन्नू मानीवर सुद्धा नजर असेल.
दोन्ही टीम्सची प्लेइंग-11
टीम इंडिया : स्मृति मांधना (कॅप्टन), शेफली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, कनिका आहूजा, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, मिन्नू मानी, राजेश्वर गायकवाड़
मलेशिया : विनफ्रेड डुराइसिंगम (कॅप्टन), एना हामिजाह, मास एलिसा, वान जूलिया (विकेटकीपर), माहिराह इजाती, एना नाजवा, वान नूर जुलाइका, नूर अरियाना नाट्स्या, एलिसा इलिसा, नूर दानिया सुहादा, निक नूर एटिला.